पोस्ट्स

वाढदिवस विशेष लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मला याचा अभिमान आहे?

इमेज
                             आपल्यापैकी अनेकांना एखादी व्यक्ती काही विशेष कारण नसेल तरीही आवडते‌. त्या व्यक्तीबाबत आपणास ममत्व वाटते.माझ्याबाबत देखील हा प्रकार घडतो.मला दोन व्यक्तीबाबत ममत्व वाटते .त्यातील एक इतिहासातील आहे‌.तर दुसरी व्यक्ती वर्तमानातील आहे‌. इतिहासातील व्यक्तीचे नाव आहे, नारायणराव पेशवा.ज्यांचा स्वत:चा आणि त्यांचा मुलाचा घराण्यातील सत्ता संघर्षात जीव गेला. (नारायणरावांचा खून प्रसिद्ध आहेच.तर त्यांचा मुलाला सवाई माधवराव यांना याच पेशव्यांचा सत्ता संघर्षातून आत्महत्या करावी लागली).वर्तमानकाळात असणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे,सुपर ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद. आता या दोन एकमेकांशी काहीही संबंध नसणाऱ्या व्यक्तींबाबत एकाचवेळी ममत्व वाटायचे कारण काय ?असा आपणास प्रश्न पडला असेल ना? तर सांगतो मी, नारायणराव पेशवा आणि सुपर ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांच्यातील सामाईक दुवा म्हणजे आमच्या तिघांची जन्मतारीख एकच १०ऑगस्ट आहे. (अर्थात वर्ष वेगवेगळे) माझ्या जन्मतारखेला जन्मलेल्या व्यक्ती म्हणून मला त्यांच्यावि...

73 वर्षाची यशस्वी परंपरा!

इमेज
    भारताच्या 74वा स्वातंत्र्यदिन जवळ आला आहे. त्यानिमित्ताने आतापर्यत भारताने विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा आढावा माध्यमांकडून घेण्यात येत आहे. या मालिकेत भारतीय अणूउर्जा आयोगाचे नाव घ्यावेच लागेल. भारत स्वतंत्र झाल्यानंतर वर्ष पुर्ण होण्याचा आत अर्थात 1948 आँगस्ट 10 रोजी भारतीय अणूउर्जा आयोगाची उभारणी, भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहारलाल नेहरु यांच्या नेर्तृत्वाखाली, डाँक्टर होमी भाभा यांंनी केली होती. त्यानंतर शस्त्रात्र निर्मिती साठी अणू उर्जेचा वापर न करता शांततेसाठी अणू उर्जा या तत्वाचा अवलंब करत भारतीय  अणू उर्जा विभागाची घौडदौड सुरू झाली. जी आजपण सुरु आहे.कँन्सर सारख्या व्याधींचे निदान करणे, धातूच्या जोडकामातील दोष शोधणे, उर्जानिर्मितीसाठी, तसेच औद्योगिक कामासाठी अणू तंत्रज्ञानाचा वापर करणे ही उदिष्टे भारतीय अणूउर्जा आयोगाची आहे.      आजमितीस भारताने NPT आणि CTBT या करारांवर सही केलेली नाही. मात्र तरी देखील भारताला अणू उर्जा क्षेत्रात जवाबदार धरलं जात.पाकिस्तानच्या अणूशास्त्रज्ञ सारख बेजावबदारपणा भारतातील कोणीही करणार नाही (पाकिस्तानच्या अण...

वंदन त्यांचा बलीदानास !

इमेज
                         आजपासून 35 वर्षापूर्वीची गोष्ट आहे.खलीस्तान आंदोलनानंतर पंजाब शांत होत होता . तो आँगस्ट मधील रविवार होता. तारीख होती 10 आँगस्ट 1986 .पुणे शहरातील कँम्प भागात अचानक गोळीबार होतो.दुचाकीवरुन आलेल्या  दोन व्यक्ती घरासाठी भाजी घेवून  जाणाऱ्या   कारमधील दोन जणांना गोळ्या घालून पसार होतात. गोळीबारामुळे दोघांचाही मृत्यू होतो . आणि इतिहासात नोंद होते. दोन वर्षापुर्वी 1984 जून 3 रोजी झालेल्या आँपरेशन ब्ल्यु स्टारमध्ये महत्तवाची भुमिका बजावणाऱ्या लष्करप्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य यांची खलीस्तानवादी अतिरेक्यांनी हत्या केली. या गोळीबारात माजी लष्करप्रमुख जनरल अरूणकुमार वैद्य यांच्या मानेत आणि पाठीत एकुण 8 गोळ्या लागल्याने जागीच मृत्यू होतो. तर त्यांचा अंगरक्षकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला .                     आज 2021 साली त्यांच्या हौताम्यास 35 वर्षे पुर्ण होत आहे. त्यानिमित्ताने त्यांना भावपूर्ण आदरांजली. त्यांनी भारताच्या एकात्मेतेसाठी आपल...

वाढदिवस एका मराठी म्हणीचा

इमेज
  आपल्या मराठीला म्हणी वाक्यप्रचार यांचा प्रचंड साठा लाभलेला आहे . यातील काही म्हणी, या लोकांच्या अनुभवातून, समाजाच्या चालीरितीतून जन्माला आलेल्या आहेत . तर काही म्हणी, वाक्यप्रचारांचा उदय होण्यामागे एखादी ऐताहासिक घटना कारणीभूत आहे. जसे पानिपतच्या तिसऱ्या युद्धातील हानीमुळे सर्वश्व नाहीसे होणे यासाठी उदयास आलेली पानिपत होणे ही म्हण अथवा खुप मोठा पराक्रम केल्यास त्याचे वर्णन करायला वापरली जाणारी अटकेपार झेंडा रोवणे ही म्हण  .                1758साली आँगस्ट महिन्याच्या दहाव्या तारखेला झालेल्या अटकेच्या विजयाच्या  घटनेमुळे समस्त भारतीयांना आणि अफगाणिस्तानातील 1989पर्यत (युनाटेड सेव्हीयत  सोशालिस्ट रशियाने आक्रमण करण्यापर्यत) सत्ताधिश असणाऱ्या  सत्ताधिशांना मराठी सत्ता काय चीज आहे हे समजले. येत्या सोमवारी अर्थात 10आँगस्ट 2020रोजी या घटनेला तब्बल 262 वर्षे पुर्ण होत आहे .त्या निमित्ताने समस्त मराठी भाषिक जनतेला वंदन .                 सन 1962रोजी चीनने भारतावर आक्रमण केल्यावर महाराष्ट्रीय...

नारायणराव पेशवे सत्तापिपासू राजकारणाचा बळी

इमेज
आपल्या महाराष्ट्रात अनेक प्रसिद्ध राजघराणी राज्य करुन गेली . त्यापैकी प्राचीनयुगात सातवाहन घराणे आणि मध्ययुगात यादव घराणे अणि भोसले घराणे आणि पेशवा घराणे ही प्रमुख घराणी आहेत .या घराण्याचा काळात समाजव्यवस्था कोणत्या प्रकारची होती . यावर या आधी प्रचंड प्रमाणात लिहले गेले आहे .या घराण्याचा विविध व्यक्तींवर लिहलेलेसुद्धा प्रचंड  साहित्य उपलब्ध आहे. या सर्व घराणे आणि व्यक्तीमत्वातील एका व्यक्तीमत्वाने मला प्रचंड भुरळ घातली आहे . ते व्यक्तीमत्व म्हणजे घराण्यातील सत्तापिपासू काकामुळे ज्याचा अधिकारपदाची वस्त्रे हाती घेतल्यावर तीन महिन्यात किंवा  वयाची 18वर्षे आणि 20 दिवस पुर्ण  झाल्यावर खुन करण्यात आला , ते पेशव्यांमधील सर्वात कमी राजपदावर असणारे व्यक्तीमत्व अर्थात नारायणराव पेशवे           10 आँगस्ट 1755 ते 30 आँगस्ट 1783 हा त्यांचा कालखंड . त्यांची आणि माझी जन्मतारीख ही सारखीच 10आँगस्ट  . त्यामुळे असेल कदाचित मला नारायणराव पेशवे यांच्या विषयी विलक्षण कुतूहल आहे . त्यांचे अकाली निधन  झाल्यामुळे त्यात वाढच झाली आहे . द्वापारयुगात महाभारतातस...