पोस्ट्स

ऑगस्ट ७, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नव्या खंडाच्या प्रसवकळा

इमेज
              मी अनेकदा चँनेल न्युज एशिया, एन एच के वर्ल्ड, सि एन एन आदि वृत्तवाहिन्यांच्या संकेतस्थळाला भेट देत असतो . अनेक नविन माहिती त्यामुळे होत असते. मी तीन चार दिवसापुर्वी अशीच भेट दिली असता बिबिसी वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावरील  विज्ञान विषयक विभागामध्ये दोन  नविन माहिती मिळाल्या.  त्यानंतर मी मराठी वृत्तवाहिन्यांवर सबंधित बातमी शोधण्याचा प्रयत्न केला असता, ती न मिळाल्याने आजचे लेखन त्या बातमीविषयी .पहिल्यांदा या संकेतस्थळावर त्या दोन बातम्यांमध्ये लेटेस्ट अपडेट असणारी बातमी बघूया .नंतर काहीसी जूनी असणारी बातमी बघूया .या दोन्हीच्या लिंक मी या लेखाच्या खाली दिलेल्या आहेत .                  तर मित्रांनो आफ्रिका खंडाजवळ असणारी सोमालियन प्लेट ही आफ्रिकन प्लेटपासून दुर जात  इंडो आँस्टोलियन प्लेटकडे वेगाने सरकत असल्याने आफ्रिका खंडाचे दोन अथवा तीन भागात विभाजन होण्याची प्रक्रीया सुरु झाल्याची भुगर्भ शास्त्रज्ञांना खात्री पटल्याची ती बातमी होती .तसे बघायला गेले तर असे काही होत असेल याबाबत भुगर्भ शास्त्रज्ञांना सन 2016 पासून अंदाज होताच, मात्र त्याचे ठोस म्हणता येतील असे पुरावे मिळत नव

अजून किती बळी

इमेज
         कालचीच गोष्ट आहे, सहज टिव्हीवरील बातम्या बघत होतो . पावसाचा बातम्या झाल्यावर बघीतलेल्या एका बातमीमुळे मन अक्षरशः विष्णण झाले . अभिनेता समीर शर्मा नावाच्या एका अभिनेत्याचा आत्महत्येची ती बातमी होती .              मित्रांनो,सध्या समस्त भारतापुढील फारच महत्त्वाची समस्या कोणती असेल तर ती वाढत्या आत्महत्या होय . सुमारे दहा वर्षापुर्वी आलेल्या  थ्री इडीयट या चित्रपटात एका संवादात अमीर खानने भारतातील विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा आलेख किती भयानक आहे, हे सांगितले आहे. त्यावेळच्या वृत्तपत्रातील  पहिल्या पानावरील मथळे आठवून बघा, विद्यार्थ्यांचा आत्यहत्येच्या आकड्यांनी ते सजलेले असायचे. मात्र त्यावर फारकाही झाल्याचे नंतर मला दिसले नाही .(माझे निरीक्षण परीपुर्ण आहे, असा माझा दावा नाही.) . शेतकऱ्यांचा आत्महत्येबाबत बोलताना कृषी  उत्पादकांना रास्त भाव मिळाला पाहिजे , याबाबत बोलले जाते , मात्र त्यांचा मानसिक आरोग्याबाबत चुपी साधली जाते . आज आपल्या भारतातील मानसिक आरोग्याची अवस्था अत्यंत वाईट आहे . जागतिक पातळीवर दर हजार लोकसंख्येमागे किमान किती मानसोपचार तज्ज्ञ असावेत याचे प्रमाण निश्चीत करण्