पोस्ट्स

फेब्रुवारी १६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महाराष्ट्र एस टी जिंदाबाद !

इमेज
      दिनांक 14 फेब्रुवारी रोजी मी जव्हार मार्गे नाशिक ते ठाणे प्रवास केला . या प्रवासादरम्यान मला नव्याने जाणवलेल्या  सर्वसामान्यांप्रती असणाऱ्या आपल्या एसटीच्या बांधिलकीवर  प्रकाश टाकण्यासाठी आजचे लेखन .       तर मित्रांनो, आपल्या एसटीचे अनेक मार्ग हे कोणत्याही व्यवसाईक गणिताचा विचार न करता निव्वळ लोककल्याणाचा हेतूने आखलेले असतात. अन्य खासगी वाहतूकदार ज्या मार्गाने कधीही सेवा देणार नाही. अस्या मार्गावर देखील आपली एसटी सेवा देते. जसे  नाशिकच्या ठक्कर बझार स्टँडहुन दुपारी दोन वाजता सुटणारी नाशिकहुन ठाण्याला मोखाडा वाडा मार्गे जाणारी बससेवा होय. गरीबातील गरीब देखील नाशिकहुन ठाण्याला जाण्यासाठी ही बससेवा वापरणार नाही. शहराच्या व्यक्तींना जवळच्या खेड्यात जाण्यासाठी किंवा खेड्यातील व्यक्तींना जवळच्या शहरात येण्यासाठी या प्रकारची सेवा वापरली जाणार , हे निश्चित .या प्रवासात जव्हार या ठिकाणी मी बसस्टँडवर बघीतलेली जव्हार -कसारा- मोखाडा ही सेवा देखील याच प्रकारात मोडणारी .जर आपण नकाशा बघीतला तर मोखाड्याहून जव्हारला सरळ रस्ता आहे. मात्र वाट वाकडी करुन खेड्यातील लोकांना चांगली सेवा देणारी आपली एस

दादासाहेब फाळके एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व!

इमेज
             आज 2021 फेब्रुवारी 16 अर्थात भारताच्या चित्रपटश्रुष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा 75वा स्मृती दिन . त्यानिमित्ताने आज अब्जावधीची उलाढाल करणाऱ्या भारतीय चित्रपटश्रुष्टीच्या जन्मदात्यास विनम्र आदरांजली.            समाजात कोणतीही नविन गोष्ट रुजवणे कधीही कठीणच असते, मात्र एकदा रुजली की तीची वाढ होण्यास तितकासा त्रास होत नाही. हा निसर्गाचा नियम भारतीय चित्रपटश्रुष्टीला देखील लागू होतोच. त्यामुळे दादासाहेब फाळकेंना भारतात ही कला रुजवण्यासाठी प्रचंड कष्ठ घ्यावे लागले. त्यांना या नविन कलेबाबत लोकांनी नाना प्रश्न विचारुन भंडावून सोडले. त्यांचाबरोबर काम करण्यास नकार दिला, जे आपण हरीश्चंद्राची फँक्टरी या चित्रपटात बघीतले आहेच.  त्र्यंबकेश्वर सारख्या आजही धार्मिक कार्यासाठी विख्यात असणाऱ्या आणि क्षेत्रफळाचा विचार करता जेमतेम असणाऱ्या गावात त्यांचा जन्म झाला होता, ही गोष्ट दुर्लक्षून चालणार नाही. एखाद्या मोठ्या महानगरातील व्यक्तीने भारतीय चित्रपटश्रुष्टीची निर्मिती  केलेली नाही. तर आजही प्रचंड धार्मिक पगडा असणाऱ्या गावातील व्यक्तीने ती केली आहे. ही बाब आपण विशेषतत्वाने लक्षात घेणे आवश