पोस्ट्स

नोव्हेंबर २९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

२०२३ वर्ष आहे खास कारण .....

इमेज
      सध्या सुरु असणारे ग्रेनियन वर्ष संपायला सुमारे एक महिना शिल्लक असला तरी नव्या  ग्रेनियन वर्षाची दिनदर्शिका आणि रोजनिशी बाजारात आताच दाखल झालेल्या आहेत , हे आपणास बाजरपेठेत फेरफटका मारल्यास सहजतेने लक्षात येते . येणारे २०२३ हे वर्ष भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे कारण आर्थिक आणि लष्करी ताकदीच्या समजल्या जाणाऱ्या जी २० आणि एस सी ओ  या परिषेदच्या अध्यक्षपदाबरोबर  सॉफ्ट पॉवर या जागतिक राजकारणात महत्त्वाच्या असणाऱ्या संकल्पनेत सुद्धा भारतासासाठी अनुकूल गोष्टी या वर्षी घडणार आहे भारताने संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत (General Assembly of United Nation) मांडलेल्या आणि २०२१ मार्च ३ रोजी संमत झालेल्या ठरावानुसार  २०२३ हे वर्ष जागतिक ज्वारी वर्गीय पीक वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे भारताच्या या प्रस्तावाला जगातील ७२ देशांनी पाठींबा दिला होता एका अर्थी भारताचा हा जागतिक राजकारणात विजयचं म्हणायला हवा     जगभरात खाल्या जाणाऱ्या गहू आणि तांदळापेक्षा या वर्गातील धान्ये काहीशी वेगळी आहेत या वर्गातील पिकांना गहू आणि तांदुळापेक्षा कमी पाणी लागते  तसेच जमिनीची सुपीकता देखील कमी असली तरी चालते