पोस्ट्स

जुलै १, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतात हे पण घडतंय

इमेज
  सध्या आपल्या महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष राज्यातील राजकीय घडामोडींकडे असले नवनियुक्त एकनाथ शिंदे यांचे सरकार कोणत्या प्रकारे कामकाज करते . माजी मुख्यमंत्री नि शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे या नव्या सरकारशी कोणत्या प्रकारे संबंध ठेवतात .? या कडे असले तरी देशाच्या परराष्ट्र धोरणा संदर्भात अनेक घडामोडी सध्या घडत आहे एक जागरूक नागरिक या न्यायाने आपणास त्या माहिती असणे आवश्यक आहे चला तर मग जाणून घेऊया त्या घडामोडी       भारत आणि मेक्सिको यांच्यातील परराष्ट्र कार्यालयातील सल्लामसलतांची सहावी फेरी 29 जून 2022 रोजी मेक्सिको सिटी येथे आयोजित करण्यात आली होती. उत्तर अमेरिका खंडातील अमेरिका या देशाच्या दक्षिण दिशेला सीमा शेअर करणारा, स्पेन या देशाचे पूर्वी राज्य असणारा लॅटिन अमेरिका प्रदेशला अमेरिका या देशाबरोबर जोडणारा सेतू जो अनेकदा लॅटिन अमेरिका प्रदेशातून अमेरिका देशात येणाऱ्या निर्वासितांच्या लोंढ्याच्या संख्येमुळे चर्चेत येणारा देश मेक्सिको होय . पृथ्वीगोलाचा विचार करता आल्या भारताच्या पूर्णतः नाही पण  बऱ्याच अंशी विरुद्ध दिशेला असणारा देश म्हणजे मेक्सिको  या मेस्किको देशाबरोबर झालेली चर्चा भ