पोस्ट्स

जून १७, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

खेळांचा राजा बुद्धिबळ

इमेज
                                  आपल्याकडे आंब्याला फळांचा राजा , गुलाबाला फुलांचा राजा  म्हणून संबोधले जाते . त्याचा धर्तीवर खेळांचा राजा म्हणून कोणास संबोधायचे झाल्यास ती जागा घेण्यासाठी बुद्धिबळापेक्षा दुसरा दावेदार असूच शकत नाही , यात शंका नसावी . शारीरिक तंदरुस्तीबरोबर बुद्धीचे सामर्थ्य जोखणारा दुसरा खेळ असूच शकत नाही . काही जणांना आश्चर्याचे वाटेल, मात्र बुद्धिबळात शारीरिक क्षमता काशीकाय  जोखली जाते ? त्यांना मी सांगू  इच्छितो की  निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते हे तुम्हाला ज्ञात असेलच . जर तुमचा एखादा पाय अथवा एखादा हात जर जायबंदी असेल तर तुम्ही योग्य पध्द्तीने एखाद्या गोष्टीवर लक्ष देऊ शकणार नाही . आता शाररिक तंदुरुस्ती शिवाय आपण हातपाय जायबंदी होण्यापासून कसे काय रोखू शकू ? म्हणजेच एकाच वेळी शारीरिक आणि मानसिक कणखरपणा जोखणारा हा खेळ आहे .                  काही जण असे हि म्हणू शकतील की बाकीच्या सर्वच खेळात कमी अधिक प्रमाणात हे जोखले जाते . महा बुद्धिबळालाच खेळांचा राजा म्हणून का संबोधायचे   ? त्यांना मी सांगू इच्छितो की , जर अन्य खेळात या क्षमता तपासल्या जात असल्या तर