पोस्ट्स

एप्रिल २५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

2021 मधील चौथ्या मन की बातच्या निमित्ताने!

इमेज
    रविवार 25 एप्रिल 2021 अर्थात एप्रिलच्या शेवटच्या रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांशी मन की बातद्वारे संवाद साधला.अपेक्षेप्रमाणे ही मन की बात कोरोनावरच होती.       देशातील आँक्सिजन तूटवड्यावर फारच कमी भाष्य केल्यावर आरोग्य सेवेतील विविध घटकांच्या प्रतिक्रिया घेण्यास सुरवात केली .माझ्या मते आँक्सिजन तूटवड्यावर अधिक भाष्य करणे आवश्यक होते. सध्या भारतात आँक्सिजन पुरवठ्याचा गंभीर प्रश्न बनला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने यातील भीषण वास्तव समोर आणले आहेच. मात्र यावर काहीच भाष्य करण्यात आले नाही. विविध सरकारने याबाबत काय कार्यवाही करत आहेत? याबाबत पुढील उपाययोजना काय आहेत? याबाबत अधिक माहिती मिळेल असी माझी अपेक्षा होती, जात फोल ठरली. नाशिकयेथील दुर्घटनेविषयी मोदी संवेदना व्यक्त करतील. असे वाटले होते. मात्र त्याविषयी त्यांनी मौन पाळले. फक्त एक ट्टिट करुन सोडून देण्यासारखा हा विषय नव्हता.  आरोग्य सेवेतील  2 डाँक्टर एक परीचारीका,1 रुग्णवाहिका चालक, आणि एक बरा झालेला रुग्ण यांचे मनोगत या कार्यक्रमात ऐकवण्यात आले. यांबरोबरच कोरोना रुग्णांना अन्न, जीवनावश्यक गोष्टी पुरवणाऱ्या स्वयं