पोस्ट्स

जुलै १, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

याने होवू शकतो का सकारात्मक बदल ?

इमेज
                                 माझे रविवारी सायंकाळी जूह मुंबई येथे राहणाऱ्या  आणि  मराठीसाठी कार्यरत  असणाऱ्या  एका तज्ञ व्यक्तीशी बोलणे झाले . त्यांनी मराठीसाठी काय करावे ? असे तुम्हाला वाटते असे विचारले असता,  मी म्हणालो मराठीला ज्ञानभाषा बनवण्यासाठी काहीतरी करायला पाहीजे.  असे मी त्यांना सांगीतल्यावर त्यांनी मला पूर्वी असा प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगीतले माञ तज्ञांच्या विदवत्तेकडे न बघता त्यांचा शुध्दलेखनाकडे अतिरीक्त प्रमाणात लक्ष दिल्याने तज्ञ मराठीत लिहण्यास तयार होत नाहित ते मला असेही म्हणाले की संस्कुतप्रचूर मराठी व्याकरण बदलून मराठीचे अस्सल व्याकरण वापरावे जे आपणास 18व्या शतकाच्या पुर्वीचा लेखनात दिसते ज्यात एकच उकार आणी एकच वेलांटी असे                                            माञ ब्रिटीश काळात जेव्हा मराठीचे व्याकरण सुञबध्द करण्यात आले त्यावेळी पुण्यातील त्या वेळच्या साक्षर लोकांकडून जाणूनबुजुन दोन वेलांट्या आणि  दोन उकार मराठीत घूसडण्यात आले आणी सहजसोपी मराठी अवघड करण्यात आली तिला गतस्वरुप परत देण्यात आले तर शास्ञज्ञापासून सर्वसामन्य कामगार ही सहजतेने व्यक्त हो