पोस्ट्स

नोव्हेंबर ४, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मावळत्या नामला अर्ध्य जोडुनी दोन्ही करा

इमेज
                                              आपल्या मराठीमध्ये "मावळत्या दिनकरा  अर्ध्य  जोडुनी दोन्ही करा " अशी इंदोरचे  राजकवी भा. रा. तांबे याची एक अजरामर कविता आहे  ज्यात मनुष्याच्या पडत्या काळात जग अश्या माणसाला सोडून जाते .त्याचे सखे  सोयरे देखील त्याला विसरतात . जग नेहमी विजेत्याबरोबर असते अशा संदेश दिला आहे  . हे सर्व  लिहीण्याचे कारण म्हणजे ज्या  आंतराष्ट्रीय संघटनेला भारताने जन्म दिला त्या नामकडे सध्या भारताने केलेले दुर्लक्ष . नामची १८वी  परिषद  आशिया आणि युरोप खंडाच्या सीमेवर असणाऱ्या अझरबेकिस्तान या देशाच्या राजधानीत अर्थात बाकु या शहरात  २५ आणि २६  ऑक्टोबर रोजी  झाली . मात्र त्याची म्हणावी अशी चर्चा भारतीय माध्यमामध्ये  झाली नाही .  भारतातर्फे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी यास उपस्थिती लावली . नामच्या सलग दुसऱ्या परिषदेत भारतातर्फे उपराष्ट्रपती यांनी हजेरी लावली . मात्र या परिषदेला अन्य राष्ट्रांचे प्रमुख , पंतप्रधान यांनी हजेरी लावली . एका प्रकारे भारताला आता नामची आवश्यकता नाही अशाच संदेश यातून जगाला देण्यात आला  या परिषदेत बदलते हवामान , दहशतवाद आ