पोस्ट्स

मे २१, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वेचे पाऊल पडते पुढे

इमेज
                 सध्या करोनमुळे आपल्या भारतातील औद्योगिक क्षेत्र काहीसे मंदावले असले तरी , भारतीय रेल्वेवर त्याचा काहीच परिणाम झालेला दिसून येत नाहीये , उलट भारतीय रेल्वे अधिक वेगाने प्रगती करत आहे, असेच म्हणावे लागेल अशी आजची स्थिती आहे . 26  एप्रिलला आतापर्यंतच्या  मालवाहतुकीसाठी सर्वात वेगवान अश्या WAG 9HH या रेल्वेइंजिनची यशस्वी चाचणी करून महिना पूर्ण होण्याचा आधीच 19एप्रिलला आपल्याला WAG 12B या तस्यांचं वेगवान इंजिनाची काही अपयशी चाचण्यांनंतर यशस्वी चाचणी केल्याची शुभवार्ता रेल्वेकडून देण्यात आल्याने  करोनामुळे  भारतात सध्या सुरु असलेल्या लॉकडाउनचा  काहीही परिणाम न   झाल्याचे स्पष्ट होत आहे .                भारतात मालवाहतूक आणि प्रवाशी वाहतूक  यांना एकमेकांच्या अडथळा होऊ नये ,  रेल्वेच्या  महसुलात सर्वाधिक वाटा असणारी मालवाहतूक अधिक वेगवान व्हावी , रेल्वेच्या मालवाहतुकीमुळे रस्तेमार्गे होणारी अवजड ट्रकांची कमी होऊन रस्ते अपघात कमी व्हावे , या उद्देश्याने उभारण्यात येणाऱ्या DFCसाठी खास तयार करण्यात आलेल्या या इंजिनच्या यशस्वी चाचणीमुळे भारतीय रेल्वेत एक मैलाचा दगड गाठला गेल