पोस्ट्स

नोव्हेंबर १३, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नमन आधुनिक भारताच्या निर्मात्याला

इमेज
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर आधुनिक भारताची उभारणी करण्याचे शिवधनुष्य ज्यांनी आपल्या खांद्यावर लीलया पेलले , अश्या ऋषितुल्य व्यक्तीमत्त्वांपैकी एक असणाऱ्या पंडीत जवाहरलाल नेहरु यांची 14नोव्हेंबर ही जयंती, त्या निमित्ताने सर्वप्रथम त्यांना विनम्र आदरांजली. 1947च्या सुमारास एखाद दोन वर्षे मागे पुढे  जगभरातील 90 हुन अधिक देश पारतंत्रातून स्वतंत्र झाले, त्या देशातील आजची स्थिती आणि भारताची सद्यस्थिती याचा मागोवा घेतल्यास आपणास पंडीत नेहरु यांचे योगदान लक्षात येते. भारताच्या स्वातंत्र्याच्यावेळी अनेक ब्रिटीश आणि पाश्चात्य विचारवंतांनी भारताच्या भवितव्याबाबत अत्यंत प्रतीकुल मते व्यक्त केली होती. ती मते खोटी ठरवली गेली, ती पंडीत नेहरुंमुळेच. एखाद्या वर्गात जर 60 विद्यार्थी असतील, तर वर्गातील सर्वच विद्यार्थी  पहिल्या क्रमांकावर उतीर्ण होत नाही, एखाद दुसराच पहिलाच क्रमांकाने उतीर्ण होतो, मात्र यामुळे पंधरा अथवा विसाव्या क्रमांकाने उतीर्ण झालेल्या विद्यार्थ्याला कमी लेखणे चूकीचे असते. तसेच भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या देशांचे आहे. भारताबरोबर स्वतंत्र झालेल्या देशांपैकी काही देश प्रगतीबाबत भारताच्या

धनत्रयोदशी विशेष

इमेज
बाल गोपाळ अबाल वृद्ध ज्या सणाची आतुरतेने वाट बघत असतात , ज्याच्या बाबतीत दिवाळी सण मोठा , नाही आनंदाला तोटा ,असे म्हटले जाते , त्या दिवाळीचा आज पहिला दिवस अर्थात धनत्रयोदशी . त्या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा. आजच्या दिवशी वैद्यकशास्त्राची देवता असलेल्या धन्वंतरीची पुजा करुन आपल्या चांगल्या आरोग्याची मनोकामना केली जाते. धन्वंतरीकडे ,दिर्घायूसाठी प्रार्थना केली जाते .काही समाज घटकात आज धनाची देवता असणाऱ्या कुबेराचे पुजन केले जाते.  दिवसामागे काही दंतकथा सांगितल्या जातात त्यौेकी एक म्हणजे  या दिवशी कथित भविष्यवाणीनुसार हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मुत्यूमुखी पडणार होता. आपल्या मुलाने जीवनातील सर्व सुख उपभोगावे म्हणून राजा, राणी त्यांचे लग्न करून देतात. लग्नानंतर चौथा दिवस त्यांचा मुत्यूमुखी पडण्याचा दिवस असतो. या दिवशी रात्रभर त्यांची पत्नी त्याला झोपू देत नाही. तसेच त्यांच्या अवतीभोवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवते. सर्व महालात लखलखीत प्रकाश केला जातो. त्यावेळी यमराज त्याच्या खोलीत सर्प रूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. मात्र सोने-चांदी, मोहरांनी त्यांचे डोळे दिपून