पोस्ट्स

नोव्हेंबर २, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

असा बालनायक होणे नाही!

इमेज
                 कालचीच गोष्ट आहे. फेसबुकवर सहज पोस्ट बघताना एक पोस्ट दिसली. ज्यामध्ये एका व्यक्तीने पुण्यामध्ये आँफलाईन अथवा आँनलाईन कस्याही पद्धतीने चालेल पण फास्टर फेणेचे अंक मिळतील का ?अशी विचारणा केली होती. ही पोस्ट बघून माझा मनात एक प्रश्न वारंवार मनात येत आहे. तो म्हणजे पुर्वीच्या मराठीत असणारे फास्टर फेणे, बोक्या सातबंडे सारखे बाल नायक परत आपल्या मराठीत होतील का?                       सध्याचा काळातील बालनायक म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल, असे डोरेमाँन, निंज्जा हातोरी, शिनच्यन, हे या बालनायकांच्या पासंगालाही पुरणार नाहीत. छोटा भीम या ईतर बालनायकांच्या पेक्षा काहीसा सरस ठरेल, इतकेच. वासरात लंगडी गाय शहाणी, या तत्वामुळे. मात्र पुणे परीसरातील उरळी कांचन, हडपसर आदी भागातील छोटा गुप्तहेर म्हणून म्हणून लहानमोठ्या व्यक्तींवर गारूड घातलेल्या फास्टर फेणेची काही औरच वेगळी.  फास्टर फेणेची कथा पहिल्यांदा येऊन कैक पिढ्या लोटल्या , तरी त्याची मोहिनी अजून देखील आहे . फास्टर फेणेमध्ये वर्णन केलेले शहर पुणे आहे, ज्याना जुन्या पुण्याची ओळख आहे, ते सहजतेने हे ओळखू शकतात . मात्र फास्टर फेणे मध्ये