पोस्ट्स

डिसेंबर २, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय क्रिडा क्षेत्रासाठी सुवर्ण क्षण

इमेज
2डिसेंबर 2023हा दिवस भारतीय बुद्धीबळ क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी लिहला जाईल. कारण या दिवशी महिला बुध्दीबळ खेळाडू  वैशाली रमेशबाबू  यांनी भारताला 84वा ग्रँडमास्टर मिळवून दिला .  वैशाली यांनी  स्पेनमधील एलोब्रेगॅट ओपनमध्ये सलग 2 विजयांसह दमदार सुरुवात करत ग्रँडमास्टर  होण्यासाठी आवश्यक अस्या 2500 रेटिंगचा टप्पा ओलांडला ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक असे अन्य  तीन निकष या आधीच पुर्ण केल्याने त्यांनी ग्रँडमास्टर भारताचे 84वे ग्रँडमास्टर म्हणून आपले नाव कोरले वैशाली रमेशबाबू आता महिला बुद्धिबळात जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानी तर  भारतात  दुसऱ्या स्थानी आहेत.  ग्रँडमास्टर होण्यासाठी पुरुष आणि महिलांचे निकष थोडेसे वेगळे आहेत. पुरुषांमध्ये ग्रँडमास्टर होण्यासाठी किमान 2500फिडे गुणांकन आवश्यक आहे.मात्र महिलांना थोडे कमी फिडे गुणांकन आवश्यक आहे.महिलांना ग्रँडमास्टर  होण्यासाठी आवश्यक असे  फिडे गुणांकन प्राप्त केल्यानंतर संबंधित महिला बुद्धीबळपटुस वूमन ग्रँडमास्टर हा किताब देण्यात येतो.मात्र त्यानंतर संबंधित महिला बुद्धीबळपटुंचे फिडे गुणांकन 2500 झाल्यानंतर त्यांना ग्रँडमास्टर हा किताब देण्यात येतो.