पोस्ट्स

नोव्हेंबर ६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अस्थिरतेच्या कड्यावर पाकिस्तान ?

इमेज
    सध्या आपल्या महाराष्ट्रात राजकीय लाथाळ्यांच्या बातम्या तसेच दिवाळीविषयक बातम्यां देण्यात माध्यमे व्यस्त असताना आपल्या शेजारील पाकिस्तान अस्थिरतेच्या कड्यावर तर नाही ना ? असे वाटावे अश्या बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांतून वाचायला मिळत आहे .     पाकिस्तानने त्यांच्या देशातील राजकीय अस्थिरता लक्षात घेवून तैहरीके ए लब्बेक या संघटनेवरील बंदी हटवणे, त्यांना निवडणूका लढवण्याची परवानगी देणे, तसेच पाकिस्तानच्या तूरुंगातुन 2300 तैहरीके ए लब्बेक च्या कार्यकर्त्यांची मुक्तता करण्याची बातमी ताजी असताना पाकिस्तानमधील दूसरी दहशतवादी संघटना तैहरीके तालीबान पाकिस्तान (संक्षीप्त नाव TTP) या संघटनेबरोबर शांततेविषयक चर्चा सुरु केल्याची बातमी wionने दिली आहे. टी टी पी या दहशतवादी संघटनेची स्थापना 2007 साली झाली. स्थापनेनंतर काही वर्षातच आपल्या हल्यातून सर्वाधिक बळी घेणारी दहशतवादी संघटना म्हणून तैहरीके तालिबान पाकिस्तान (टी टी पी) ओळखली जावू लागली. एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत जर दहशतवादाचा मार्ग सोडून लोकशाही मार्ग स्विकारत असल्याचे दिसून आल्यास आम्ही त्याचाशी चर्चा करायला तयार आह

भाउबीज विशेष

इमेज
  आज दिवाळीचा शेवटचा दिवस अर्थात भाउबीज , भाउ आणि बहीणीचा नात्याचा हा दिवस आजच्या दिवशी पुरुषाने आपल्या पत्नीचा हातचे न खाता,आपल्या बहीणीचा हातचे खाणे शुभ मानले जाते.आजच्या दिवशी यमुना नदीने आपला भाउ यम यास ओवाळले होते . त्यामुळे प्रसन्न होवून आजच्या दिवशी जी स्त्री आपल्या भावाला ओवाळेल, त्या दोघांना दिर्घायू मिळेल, असा आशिर्वाद दिला .ज्यामुळे याला यमद्वितीया असे देखील म्हणतात.               कायस्थ समाजबांधव   या दिवशी चित्रगुप्ताच्या देवळात जाऊन दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात. या दिवशी यमराजाने आपली बहीण यमुनेच्या घरी जाऊन तिला वस्त्रे अलंकार इत्यादी वस्तू देऊन तिच्या घरी भोजन केले म्हणून या दिवसाला यमद्वितीया म्हणतात. या दिवशी यमुना नदीत स्नान करणे अत्यंत पवित्र मानतात म्हणजे असे केल्यामुळे त्यावर्षी यमपासून तरी भय नसते असा समज आहे. यम आणि यमी या भावा-बहिणीच्या प्रेमाबद्दल अशी कथा आहे की यम मृत्यू पावला त्यावेळी यमीला एवढे दुःख झाले की ती आपली रडणे व डोळ्यांतील अश्रू काही केल्या थांबवेना. तेव्हा शेवटी दिवस संपला हे दाखवण्यासाठी देवाने रात्र निर्माण केली आणि मग यमीचे भावा बद्