पोस्ट्स

डिसेंबर १५, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या वरून भारतात उठलेलल्या वादळाच्या निमित्याने .(भाग 1)

इमेज
        भारतीय संविधान जगातील एक चांगल्या संविधांपैकी एक आहे . यामध्ये अनेक बाबी सखोलपणे मांडण्यात आल्या आहेत.    भारतीय संविधानाच्या दुसऱ्या भागात अर्थात भारतीय संविधानाच्या कलम 5 ते 11 दरम्यान सांगितलेल्या नागरिकत्वाच्या तरतुदी , त्या बदलण्यासाठीच्या करावयाच्या तरतुदी या त्यापॆकीच एक .  . याच संविधानाच्या कलम 11 नुसार सन 1955 मध्ये तयार करण्यात आलेल्या नागरिकत्वाच्या कायद्यातील तरतुदीतील   बदल खूपच चर्चेत आहे . सध्या समस्त भारतात चर्चित विषय असलेले  नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या पाय म्हणून याकडे बघावे लागेल .              मित्रानो , 1955 मध्ये तयार करण्यात आलेल्या या नागरिकता कायद्यातील सध्या चर्चेत असणारा बदल   पाचवा  बदल आहे . याआधी सन  1986, 1992, 2003, 2015 यावर्षी या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या . या बदलांर्गत मूळ कायद्यानंर्गत काय बदल करण्यात आले हे सांगण्यासाठी आजचे लेखन आहे . सन  1955च्या कायद्यात कोणाला नागरिकत्व मिळू शकते आणि कोणत्या प्रकारे नागरिकत्व मिळू शकते आणि  नागरिकत्व लोप पाऊ शकते हे सांगितले आहे   सन 1955 च्या मूळ कायद्यानानुसार पाच प्रकारे नागरिकत्व म