पोस्ट्स

ऑगस्ट १९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मना सज्जना

इमेज
       १८ ऑगस्ट रोजी नाशिक जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली . आईने मोबईल खेळायला न दिल्याने एका १२ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची ती घटना होती . उद्याचे भविष्य ज्या व्यक्तींच्या हाती आहे तिची मनोवस्था कोणत्या  परिस्थितीत  आहे याचा हा ठसठशीत पुरावाच म्हणता येईल .  हे फक्त एका प्रातिनिधिक उदाहरण आहे जर आपण रोज वर्तमानपत्राचे वाचन केले तर आपणस अश्या अनेक घटना वाचावयास मिळतील .  एक गंभीर समस्या असून देखील आपणाकडे याकडे दुर्दैवाने फारशे काही बॊलले जात नाही . अशी एखादी घटना ऐकल्याने  आई वडिलांनी अति लाड केल्याने त्या मूलने मुलीने असे पाऊल उचलले असे म्हणून सोडून देण्यासारख्या या घटना नाही अति लाडाने १०० मुलामुलींपैकी एखादा असे टोकाचे पाऊल उचलेल मात्र जेव्हा अश्या घटनांची संख्या प्रचंड वाढते तेव्हा ती समस्या फक्त काही लोकांची वैयक्तिक समस्या राहत नाही तर सामाजिक समस्या होते  लहान मुळा मुलींची आत्महत्या  हि सुद्धा अशीच सामाजिक समस्या आहे     पूर्वी कधीही होत  नव्हत्या इतक्या मोठ्या प्रमाणात आता सुजाण पालकत्वाबाबत कार्यशाळा होत आहेत . विविध वृत्तवाहिन्यावरील कार्यक्रम आणि वृत्तपत्रातील लेख बघत

डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आम्हाला माफ करा

इमेज
तिर्थस्वरुप डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना साष्टांग नमस्कार      डॉक्टर आम्हाला माफ करा . येत्या 20   आॉगस्टला तुमच्या जाण्याला तब्बल 9 वर्षे होतील . माञ न्यायालयात खटला उभा राहणे तर दुरच आम्ही तुमच्या मारेकऱ्यांना   पण पकडु शकलो नाही . नाहि म्हणायला आम्ही काही संशयीतांची चौकशी केली . तुमच्या तत्वात न बसणारा प्लँचेट आदी प्रकार करून तुमच्या मारेकऱ्याला   शोधण्याचा प्रयत्न केला . पण उपयोग शुन्य झाला . त्या बद्दल आम्हाला माफ करा   ? काही महिन्यांपूर्वी   कोल्हापुरच्या गोविंद पानसरे यांच्या हत्येची प्राथमिक चौकशीसरकारकडून पूर्ण झाल्याविषयी    बातमी वाचली .   तेव्हा मनात विचार आला तूमच्या बाबतीत ही बातमी कधी वाचायला मिळेल जेव्हा मिळेल तो सुदिन असेल खरच .. डॉक्टर तुमच्या   हत्येचे मारेकरी पकडले तरी त्याना शिक्षा होण्यासाठी किती कालावधी लागेल . महात्मा फुल्यांचा निर्मीकासच ठाउक असेल कदाचित ? तुमच्या हत्येचे मारेकरी म्हणून . काही जणांना संशयित म्हणून अटक करून चौकशी करण्यात आली . मा