पोस्ट्स

फेब्रुवारी १४, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एका महत्त्वाच्या मात्र दुर्लक्षित गोष्टींकडे लक्ष वेधून घेणारे पुस्तक, "ऑटीझम

इमेज
पुर्वीच्या तूलनेत सध्याचा काळात आपल्या भारतात अनेक विकारांबाबत मोठ्या प्रमाणात समाजप्रबोधन करण्यात येत असले, तरी काही विकार अजुन देखील समाज प्रबोधनाच्या बाबतीत बरेच मागे आहेत.या विकारांनी ग्रस्त लोकांची संख्या लाखोत असली तरी त्याबाबत फारसे बोलले जात नाही.समाजप्रबोधनाचे महत्त्वाचे माध्यम असलेल्या चित्रपटातच नव्हे, तर वैद्यकीय स्तरावर सुद्धा त्याबाबत व्यापक चर्चा होत नाही.परीणामी या धोक्याची जाणीवच जन सामन्यांना होत नाही, ऑटीझम हा असाच फारसा चर्चिला न जाणारा विकार . सुमारे २टक्के (अचूकपणे सांगायचे झाल्यास दर ५४पैकी १) इतक्या लोकांना होणारा एक गंभीर स्वरुपाचा विकार.ज्या अभागी जणांना हा विकार होतो त्या व्यक्तींचेच नव्हे तर त्यांचे कुटुंबियांचे भावविश्व पुर्णतः नष्ट करणारा हा विकार. आपल्या मराठीचा विचार करता या विषयी जवळपास काहीच लिहलेले आढळत नाही..त्यातही जे काही आढळते,त्यात शास्त्रीय माहितीचा अभावच दिसतो..मात्र ही पोकळी भरुन येते, ती मराठीला ज्ञानभाषा करण्यासाठी झटणाऱ्या अच्यूत गोडबोले यांच्या "ऑटीझम या पुस्तकामुळे. स्वतःच्या मुलाला ऑटीझम झाल्यामुळे त्यातील दाहकता जवळुन अ