पोस्ट्स

जून १७, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वेची अपरीचीत कहाणी (भाग7)

इमेज
              आपल्या भारतीय रेल्वेत रोज 12 ते 13 हजार प्रवाशी गाड्या चालवल्या जातात. (सध्याची अपवादात्मक स्थिती सोडून देवूया ) आँस्टोलिया या देशाच्या एकुण लोकसंख्येएव्हढे लोक दररोज प्रवास करतात. तसेच अनेक मालगाड्या चालवल्या जातात. या सर्व गाड्यांना इच्छित स्थळी नेणाऱ्या रेल्वे इंजिनाचे जग खुपच रंजक आहे. भारतीय रेल्वेच्या इतर घटकांविषयी खुप लिहले जाते बोलले जाते . मात्र यामागील खरा कर्ता असलेल्या इंजिनाविषयी फारच कमी बोलले.जाते..चला तर मग जाणून घेवूया त्यांचा या अज्ञात जगाविषयी              मित्रांनो, आपल्या भारतीय रेल्वेत रेल्वे इंजिनांची ओळख होण्यासाठी जे नाव दिले जाते त्याचे दोन भाग असतात .डाव्या बाजूच्या भागात तीन अक्षरे असतात. तर उजव्या बाजूला आकडा असतो. अक्षरे सबंधीत रेल्वे इंजिन कोणत्या गेजचे आहे? ते कोणत्या इंधनावर चालते?  ते कोणत्या कारणासाठी वापरण्यात येणार आहे? याविषयी सांगणारी असतात. तर अंकाद्वारे इंजिन.किती हजार अश्वशक्तीचे आहे, याचा उलगडा होतो.          आपल्या भारतात चार प्रकारचे गेज वापरले जातात.(दोन रेल्वे रुळातील अंतराला गेज म्हणतात) पहिला प्रकार ब्राँड गेज ज्याची 5फुट

बातमीतील चीन (भाग 11)

इमेज
सध्याचा काळात खचितच एखाद दुसरा दिवस जात असेल. ज्या दिवशी चीनचा संदर्भात काहीतरी बातमी चर्चेस आली नाही. गेल्या तीन चार दिवसाचा विचार करता चीनविषयक तीन घडामोडी घडल्या. चीन भारताच्या सुरक्षेला किती मोठा धोका आहे?, चीनमुळे आपल्या प्रगतीला कसी खिळ बसते ?,हे आपण जाणतातच. त्यामुळे चीनविषयक घडामोडी माहिती असणे आपणास अत्यावश्यक आहे. तर सुरु करुया चीनविषयक या घडामोडींची माहिती करुन घेण्यासाठी .      तर मित्रांनो, जगातील सर्वात मोठ्या 7 अर्थव्यवस्था ज्या देशांचा आहे, त्यांचा एक गृप आहे, जी 7 नावाचा .ज्यामध्ये युएस, कँनडा, युके, जर्मनी, फ्रान्स इटली जपान या देशांचा समावेश होतो. त्या देशांची आँफलाइन परीषद नुकतीच युकेमध्ये झाली. त्यामध्ये सर्व दळणवळणाची संसाधने तोडत चीनविषयक एक चर्चा झाली. यामध्ये चीन, तैवान आदी मुद्द्यांची चर्चा झाली.किंबहूना या परीषदेचा सर्व रोख चीनविषयकच होता , असे म्हटल्यास वावगे ठरु नये. या चर्चेदरम्यान अँग्लो सँक्शीयन गटातील देश आणि ईतर देश यांच्यात चीन विषयक मुद्दयांवरुन मतभेत झाल्याचे वृत्त द हिंदूकडून देण्यात आले आहे.. ज्या देशातील प्रमुख धर्म ख्रिचन आहे.तसेच ज्यांची प्रमुख