पोस्ट्स

ऑगस्ट २५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जरी एसटी वाल्यांचा अश्रू पुसायास आले!

इमेज
      हे लिहीत असताना आज (25आँगस्ट) महाराष्ट्रात राजकीय बातम्यांचा महापूर माध्यमातून वहात असताना महाराष्ट्रातील एक मोठा वर्ग उद्याची चूल कशी पेटवायची? या विवंचनेत आहे.आपल्या महाराष्ट्र राज्य परीवहन महामंडळाचे कर्मचारी अधिकारी हाच तो वर्ग. आँगस्ट महिना संपायला आला आहे. मात्र तरीही त्यांचे जूलै महिन्यांचे पगार झालेले नाहीत.कारण आपल्या एसटीकडे पगार करायला पैसेच नाहीत, आणि ही पहिल्यांदाच येत आहे, असे नाही, आपल्या एसटीवर ही सातत्याने येत आहे. काही डेपोच्या सेवा डिझेल नसल्याने बंद कराव्या लागत आहे. म्हणून म्हणावेसे वाटते जरी एसटी कर्मचाऱ्यांचे अश्रू पुसायास आले, तरी जन्म काही कामास आला!      आपल्या एसटी महामंडळावर ईतकी विपन्नावस्था येण्याची अनेक कारणे आहेत. त्यापैकी एक कारण जे मी सातत्याने मांडतोय ते म्हणजे इतर राज्यांच्या एसटी आपल्या महाराष्ट्रातील एसटीचे करत असलेले शोषण. पुर्वी अनेक गावातील भिंतीवर अमूक रोगाचा रुग्ण दाखवा हजार रुपये मिळवा अस्या जाहिराती असत त्याच प्रमाणे महाराष्टातील असा तालूका दाखवा जिथे इतर राज्यातील एसटी येत नाही, दहा हजार रुपये मिळवा असी योजना सुरु करण्याईतके हे आक्रम