पोस्ट्स

जून ६, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील चीन (भाग (9)

इमेज
    सध्या घडणाऱ्या आंतराष्ट्रीय घडामोडीचा विचार केला असता एका देशाचे नाव  सातत्याने चर्चेत आलेले दिसते , तो देश म्हणजे चीन  दोनच दिवसापूर्वी मी त्या देशातील चार घडामोडी आपणास सांगितल्या होत्या , त्या सांगून जेमतेम 48 तास होत नाहीत चीनविषयी नव्याने तीन मोठ्या घडामोडी घडल्याने त्याची माहिती करून देण्यासाठी आजचे लेखन       तर मित्रांनो, चीनचा गिलगिट बाल्टीस्तानला लागून असणारा प्रांत म्हणजे झिंकियाग (याचा उच्चार काही ठिकाणी सिंकीयांग असाही आढळतो) अर्थात पुर्व तूर्कस्थान. या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यांंच्यावर चीनचे सरकार अत्याचार करत असल्याचा मुद्दा सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर खुपच गाजतो आहे. या मुस्लिम बांधवांना  विगूर मुस्लमान  म्हणतात. गेल्या 48 तासात घडलेल्या घडामोंडींमध्ये या मुद्द्याचा संदर्भात 2 घटना घडल्या आहेत. चीनचा आश्रीत म्हणता येईल, असा इस्लाम हा प्रमुख धर्म असलेला पाकिस्तान हा देश यावर जरी काही बोलत नसला तरी अन्य इस्लामी जगतात याचे पडसाद उमटत आहेत. या अन्य इस्लामी जगतातील एक देश असलेल्या  बांगलादेशामध्ये याचे तीव्र पडसाद उमटले. 3 जून या दिव