पोस्ट्स

जुलै २०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आली समिप घटीका ..... विनाशाची

इमेज
     सध्या जगाचे लक्ष अफगाणिस्तान आणि तालीबान याच्या घडामोडीबरोबर बदत्या हवामान बदलामुळे आलेल्या त्रासाकडे वेधले गेले आहेच. तालीबान आणि अफगाणिस्तानविषयी मी आधीच बोललो आहे. आज बोलणार आहे, हवामान बदलाच्या धोक्याविषयी.     तर मित्रांनो, तळ कोकणात, (रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना तळ कोकण म्हणतात, तर ठाणे रायगड, पालघर आणि मुंबई शहर तसेच मुंबई उपनगर हे जिल्हे  उत्तर कोकणात येतात सावित्री नदी त्यांची सीमा निश्चित करते.) मुंबई तसेच पश्चिम युरोपीय देशांमध्ये पाउस आणि पुरामुळे  अशरशः भंबेरी  उडाली आहे. पश्चिम युरोपात गेल्या कित्येक वर्षात पडला नाही इतका पाउस पडलाय. जगात विकसीत समजल्या जाणाऱ्या पश्चिम युरोपीय देशात 300 व्यक्ती या पावसामुळे आणि पावसामुळे आलेल्या पुरामुळे मृत्युमुखी पडलेल्या आहेत जरी तळ कोकणात पुरामुळे मृत्यूमुखी पडलेल्याची बातमी आलेली नसली तरी मुंबईत मात्र पावसामुळे  भुस्खखलन होवून कित्येक निष्पाण जीव प्राणास मुकले आहेत.एककीडे पाउस नको नकोसा करत असला तरी नाशिक मराठवाडा पावसाची आस लावून बसला आहे.     गेल्या काही महिन्यातील हवामान विषयक बातम्या बघीतल्यास निसर्गाचा लहरीपणा वाढल