पोस्ट्स

मे १२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पुन्हा पुणे अहमदनगर

इमेज
       १ जून १९४८ ही निव्वळ एक तारीख नाहीये . स्वतंत्र भारतात पहिल्यांदा सार्वजनिक बस  वाहतूक सूर झाल्याची ती तारीख आहे या वर्षी या घटनेला ७४ वर्षे पूर्ण होऊन ७५ वे वर्ष सुरु होईल आपल्या स्वतंत्र्य भारतात पहिल्यांदा सार्वजनिक बस वाहतूक सूर करण्याचा मान  त्यावेळच्या बॉम्बे स्टेट सरकारला जातो आज आपण बॉम्बे स्टेट सरकारला महाराष्ट्र सरकार म्हणून ओळखतो आणि त्यावेळी बॉम्बे स्टेटने सुरु केलेल्या  उपक्रमाला आपण आज महाराष्ट्र राज्य रोड ट्रान्सपोर्ट कॉरर्पोरेशन अर्थात महाराष्ट्राची एसटी म्हणून ओळखतो त्या वेळेस भारतातील सार्वजनिक उपक्रमांची पहिली  बस  पुणे ते अहमदनगर या दोन शहरादरम्यान धावली होती             आपली एसटी स्थापन झाल्यावर पुढे ८ वर्षांनी केंद्र सरकारकडून सार्वजनिक वाहतूक कायदा स्थापन करण्यात आला .या कायद्यानुसार पुढे विविध राज्यात त्या त्या राज्याच्या एसटी स्थापन झाल्या . आपल्या एसटीकडून देशासाठी  अनेक मापदंड निश्चित करण्यात आले .१९६२ साली चीनविरुद्धच्या युद्धात आणि १९६५ च्या पाकिस्तान विरुद्धच्या  युद्धात आपल्या लष्कराला तातडीची गरज असताना बस बांधून दिली ती आपल्या महाराष्ट्राच्या एस