पोस्ट्स

जानेवारी ११, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मेमू म्हणजे काय रे भाउ!

इमेज
    जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात 10 तारखेला भुसावळ इगतपूरी दरम्यान रेल्वेची मेमू सेवा सुरु झाली. आणि नाशिकमध्ये सर्वत्र मेमू म्हणजे काय रे भाउ असी चर्चा सुरु झाली. आपली सर्वसाधरण रेल्वे आणि मेमूमध्ये काय फरक आहे? याबाबत विविध चर्चांना नाशिकमध्ये उधाण आले.त्याविषयी सांगण्यासाठी आजचे लेखन. अनेकांना हा निर्णय केंद्र  सरकारने आताच घेतला आहे असे  वाटू शकते त्यांना मी सांगू इच्छितो की देशातील पँसेजरचे मेमूमध्ये रुपांतरण करण्याचा निर्णय मोदी सरकारने सन2018मध्येच घेतला होता . सुरवातीला पुरेसे मेमू नसल्याने आणि नंतर कोव्हीड 19चा उद्रेक झाल्याने हा निर्णय लांबणीवर पडला ,इतकेच.मोदी सरकारने  त्यासाठी देशातील चार प्रमुख शहरे दिल्ली , मुंबई, कोलकत्ता ,चेन्नई या शहरांना जोडणाऱ्या रेल्वे मार्गावर सर्वप्रथम हा बदल अमंलात आणण्याचे ठरवले आहे. पँसेजरच्या ऐवजी मेमू चालवल्यास यामार्गावरील इतर रेल्वे गाड्यांचा वेग वाढवता येईल असा रेल्वेचा कयास आहे. भुसावळ इगतपुरी हा रेल्वेमार्ग मुंबई दिल्ली आणि मुंबई कोलकत्ता या मार्गावरचा रेल्वे मार्ग आहे. त्यामुळे हा बदल करण्यात आला आहे. हा रेल्वेमार्ग जिथे रस्त्याला छेदत