पोस्ट्स

नोव्हेंबर ३०, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

का आणि कसे लिहावे,हे सांगणारे पुस्तक "लिहते व्हा,"

इमेज
आपल्याकडे सतराव्या शतकात  समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या उद्धबोधनात, दिसामंजी काहीतरी लिहावे, असे सांगितले आहे. त्यानंतरही अनेकांनी लिहण्याचे फायदे सांगितले आहेच. लिहण्यामुळे स्मरणशक्ती कसी विकसित होते, यावर देखील अनेकांनी लिहिले आहे.मात्र लिखाण करायचे ठरवल्यावर नक्की लिहायचे तरी काय ? आणि ते कसे सुरू करायचे,? या प्रश्नांबाबत मार्गदर्शन करणारे लेखन आपल्याकडे तसे कमीच.आणि या विषयावर जे लेखन उपलब्ध आहे ते देखील एखाद दुसऱ्या लेखाच्या स्वरुपात.मात्र फक्त याच विषयावर लिहलेले पुस्तक जर आपणास मिळाले तर ? सोन्याहून पिवळे असीच आपली स्थिती होणार हे नक्की. हा दुग्धशर्करा योग आपल्यासाठी जूळवून आणला आहे,नाशिकमधील व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक , मात्र बाल साहित्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणारे ज्येष्ठ साहित्यिक संतोष हुडलीकर यांनी.पुण्याचा पृथ्वीराज प्रकाशन या प्रकाशनातर्फे प्रकाशित  संतोष हुडलीकर यांच्या या पुस्तकात आपणास या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतातच तसेच लेखनाविषयी अन्य माहिती देखील मिळते‌.मी नुकतेच हे पुस्तक वाचले. सुमारे १७६ पानांच्या या पुस्तकात आपणास लेखन कोणत्या विषयावर करावे? ते क

पर्यटनाच्या निमित्ताने (भाग३)

इमेज
मला हा मजकुर लिहीत असताना अनेकजण मी एसटीच्या मार्फत काढलेल्या सोलो ट्रिप मुळे ओळखतात. आतापर्यंत मी पुर्व विदर्भाचा (नागपूर प्रशासकीय विभाग) अपवाद वगळता आपली एसटी जाते अस्या सर्व कानाकोपऱ्यात अनेकदा फिरलो आहे.या फिरण्याचा प्रक्रियेत मला अनेक भलेबुरे अनुभव देखील आले. ते देखील मी वेळोवेळी पर्यटनाच्या निमित्ताने भाग एक आणि  भाग दोन यामध्ये सविस्तर सांगितले आहेच. ज्यांना ते वाचायचे असतील अस्या व्यक्तींना ते शोधणे सोईस्कर  व्हावे यासाठी त्यांचा लिंक मी खाली देईलच.    तर माझ्या या प्रवास करण्याची सुरुवात एका अपघाताने झाली.अपघाताने म्हणजे रस्ते, रेल्वेवरील अपघात नव्हे तर माझ्या आयुष्यात अकस्मात घडलेल्या एका घटनेने .जर ती घटना माझ्या आयुष्यात घडली नसती तर मी जास्त फिरलोच नसतो असे म्हणा हवतर  कारण त्या अपघात अकस्मात घडणाऱ्या घटनेच्या आगोदर मी स्वतः एकट्याने फिरायला गेल्याचे आपणास फारसे आढळणार नाही    तर मी माझे पत्रकारितेचे शिक्षण संपवून पुण्यात एके ठिकाणी रुजु झालो‌.मी जेव्हा नाशिकहून नोकरी निमित्ताने पुण्यास आलो तेव्हा नाशिक पुणे हा राष्ट्रीय महामार्ग असला आणि नाशिक  ते पुणे अंतर फार जास्त नसल