पोस्ट्स

एप्रिल ५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आवाज आवडे दक्षिण आशियातील लोकांना

इमेज
        काल  भारतातील खासगी मालकीची आंतरराष्ट्रीय बातम्या भारतीय उच्चाराच्या इंग्रजीत देणारी, wion news ही वृत्तवाहिनी बघत होतो. या वृत्तवाहिनीवर अनेक उत्तम इतर वृत्तवाहिन्यावर क्वचितच हातळतील अस्या विषयाचा बातम्या असतात.जसे मानसिक अनारोग्य, हवामान बदलामुळे शेती उत्पादनावर होणारा परीणाम , तसेच विविध किनारी प्रदेशात राहणाऱ्या लोकांना समोरे  जावे लागणाऱ्या समस्या, बँटरीच्या विल्हेवाट लावणाऱ्या गुजरातच्या किनाऱ्यावरील लोकांची स्थिती, वगैरे. मी टिव्ही बघत असताना  ध्वनी प्रदुषणाबाबत माहिती देणारा कार्यक्रम त्यावर लागला होता.           या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे जगात सर्वाधिक ध्वनीप्रदूषण बांगलादेशाची राजधानी ढाका या शहरात होते. दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशातील मुरादाबाद हे शहर आहे. तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद तर चौथा क्रमांक बांगलादेशातील राजशाही या शहराने पटकावला आहे.ज्यामुळे दक्षिण भारतीय लोकांना गोंगाट आवडतो हे सिद्ध होत आहे.  या कार्यक्रमात सांगितल्याप्रमाणे ढाका शहरात अनेक कारणांमुळे ध्वनीप्रदूषण होत असले तरी वाहनांच्या हाँर्नमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच