पोस्ट्स

डिसेंबर २, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय बुद्धिबळपटूची विजयी घोडदौड सुरूच

इमेज
भारतीय बुद्धिबळपटूची विजयी घोडदौड सुरूच    असल्याचे वारंवार सिद्ध होत आहे . नुकतीच कोलकात्ता येथे झालेली टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धेत   जलद बुद्धिबळ या प्रकारात खेळवण्यात आलेल्या सामन्यांमध्ये पहिल्या तिन्ही क्रमांकावर भारताच्या खेळाडूंनी आपली नावे कोरून हेच सिद्ध केले आहे ही स्पर्धा मुळात युरोपातील आघाडीची स्टील कंपनी कोरस या कंपनीकडून प्रायोजित करण्यात येणारी स्पर्धा आहे काही वर्षांपूर्वी कोरस हि कंपनी टाटांनी विकत घेतल्यामुळे पूर्वीच्या कोरस स्टील बुद्धिबळ स्पर्धेचे नामकरण टाटा स्टील बुद्धिबळ स्पर्धा झाले ( एकप्रकारे हा भारताच्या उद्यमशीलतेचाच वियज आहे )   टाटा स्टील ही स्पर्धा बुद्धिबळातील विबल्डन समजली जाते या बुद्धिबळविश्वातील   अत्यंत महत्वाच्या स्पर्धेत मागच्या काही स्पर्धांप्रमाणे भारतीय बुद्धिबळपटूंनी चमकदार कामगिरी करून या आधी मिळवलेले विजय हे निव्वळ संयोग नव्हते . तर भारत   बुद्धिबळाच्या विश्वातील महासत्ता आहे त्यामुळेच हे विजय भारतीयांनी मिळवले हेच सिद्ध केले