पोस्ट्स

चर्चेतील मुद्दे लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अहो मंत्रीसाहेब, मुळातील या प्रश्नाची सोडवणूक करा. (भाग १)

इमेज
गेल्या काही दिवसापासून आपल्या महाराष्ट्र एसटी महामंडळाचे फेसबुक पेज बघितल्यावर एक गोष्ट आपल्याला प्रकर्षाने लक्षात येते ती म्हणजे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी  धडाडीच्या म्हणता येतील अशा विविध बसस्थानकांना दिलेल्या भेटी आणि या भेटीदरम्यान विविध अधिकाऱ्यांना फैलावर घेत घेतलेल्या निर्णयांची माहिती देणारे पोस्टर. हे पोस्टर बघून अनेकांना वाटू शकते चला आता आपली एसटी सुधारते आहे. काम न करता आतापर्यंत फक्त पगार घेणाऱ्या अधिकाऱ्यांना मस्तपैकी कामाला लावला आहे सरनाईक साहेबांनी. असाच कार्यक्षम मंत्री असावा. तुम्हालाही असेच वाटत असेल तर तुम्ही थांबा. वस्तुस्थिती काहीशी भिन्न आहे.  अनेकांना वाटते एसटी बस स्टॅन्डचे वॉशरूम्स नेहमीच खराब असतात. मात्र वॉशरूमच्या नावाने खडे फोडणारे लोक हे विचारात घेत नाहीत की, आपल्याकडे सार्वजनिक जीवनात कसे वागावे,  याचे शिक्षण देणारी व्यवस्थाच नाहीये. मी एसटी महामंडळाच्या 'आवडेल तिथे प्रवास' या योजनेचा फायदा घेत अनेकदा प्रवास करतो. या प्रवाशादरम्यान मी असे अनेक प्रवासी बघतो की, जे वॉशरूम वापरून झाल्यावर पुरेसे पाणी टाकत नाहीत. आणि त्यावि...

आता फक्त ५ बाकी!

इमेज
  सध्या भारतीय बुद्धिबळ विश्वाला अत्यंत सोन्याचे दिवस आले आहेत ,असे म्हंटलेतर अतिशयोक्ती होणार नाही किंबहुना भारतीय बुद्धिबळविश्व आता अत्यंत सोनेरी क्षण अनुभवत वेगाने जगाच्या अनभिषक्त सम्राटपदावर विराजमान होण्यासाठी वेगाने वाटचाल करत आहे असे म्हंटले तरच तो भारतीय बुद्धिबळ विश्वचा योग्य शब्दात केलेला गौरव ठरेल अशी आजची स्थिती आहे . महिलांच्या विश्वचषकावर भारतीय महिला बुद्धिबळपटू ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिने नाव कोरल्यावर, अगदी थोड्याच दिवसात बुद्धिबळ विश्वातील दुसरी महत्वाची स्पर्धा असलेल्या कॅन्डीडेट स्पर्धेवर ग्रँडमास्टर रमेशबाबू वैशाली हिने नाव कोरले .सायप्रस या देशात झालेल्या या स्पर्धेत विजय मिळवूनग्रँडमास्टर भारतात येत नाही तोच अजून एका आनंदाच्या बातमीने  भारतीय बुद्धिबळ विश्वाला  आनंदाला पारावरच राहिला नाही /ती होती भारताला अजून एक ग्रँडमास्टर मिळाल्याची . अरोण्यक  घोष भारताचा ९५ वा ग्रँडमास्टर बनला आहे. २००३ मध्ये जन्मलेले  अरोण्यक सध्या २२ वर्षांचे  आहे. 'बँकॉक चेस क्लब ओपन २०२६' स्पर्धेत त्यांनी आपला  अंतिम 'GM नॉर्म' (ग्रँडमास्टर पात्रता नि...

सरनाईक साहेब, याही सुधारणा करा हो!

इमेज
 मा. प्रताप सरनाईक साहेब, परिवहनमंत्री  महाराष्ट्र राज्य  यांच्या सेवेसी  साहेब, आम्ही डायव्हरांनी दारू पिऊन बस चालवू नये, तूम्ही आम्हाला ड्युटी सुरु करण्यापुर्वी टेस्ट कंम्पलसरी केली.पण साहेब आम्ही मुळात दारू का पितो,याचा विचार कराल का ?अहो प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो साहेब .अस्या वेळी ज्याचा खांद्यावर बसमधील ३०ते ३५ जणांचे भवितव्य अवलुंबन असते अस्या डायव्हरांना दारू पिऊन स्वत:सह त्यांचा जीव धोक्यात घालायला का वाटतो, याचा विचार कराल का, ? साहेब, जर कुठे नरक असेलच तर तो इथे आहे,अस्या पद्धतीच्या ठिकाणी आमच्या मुक्कामाची सोय असते.साहेब रेल्वेमध्ये डायव्हरांना रहायला चांगल्या खोल्या असतात,खायला मोफत असते.ड्युटीवर जॉइन होण्याचा आधी त्याची पुरेसी विश्रांती होईल याची काळजी घेतलेली असते.आठवड्याभरात किती तास रेल्वे चालवायची याचे निश्चित नियम आहेत.आमच्या येथे काही हाताच्या बोटावर मोजता येतील,असे अपवाद वगळता चित्र नरकापेक्षा वेगळे नाही हो साहेब. सकाळी घरुन निघताना डब्यात बांधलेले अन्नच कितीही गार झाले तरी,आम्हाला खावे लागते.ते गरम करण्याची देखील सोय अनेक ठिकाणी नाही‌.झोपा...

अमेरिकेच्या फायद्यासाठी, अमेरिकेकडून,अमेरिकेतर्फे लादण्यात आलेले युद्ध

इमेज
सध्या जगभरात अमेरीका- इराणचे युद्ध सुरू आहे, हे आपणस माहिती असेलच.इराणचा सर्वोच्च प्रमुख अयात्तूला खोमोनी हे त्यांच्या देशातील जनतेवर अत्याचार करत आहे‌ त्यावर अमेरिकेने एव्हढे मोठे युद्ध करायचे कारणच काय ?, जिनिव्हा शांती करारानुसार तो त्यांचा अंतर्गत प्रश्न समजून दूर्लक्ष का केले नाही.किंवा आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला का दाखल केला नाही? असे प्रश्न आपल्या मनात आले असतील तर सांगतो. अमेरिकेचे 'माझं ऐकत नाही, तूला संपवूनच टाकतो' हे धोरण कारणीभूत आहे त्यास.  स्वत:च्या फायद्यासाठी एखाद्या देशात अशांतता निर्माण करुन तेथील सत्ताधिश हटवायचा तिथे आपल्या बाहुल्याला राज्याभिषेक करायचा, बाहुला ऐकायचे थांबला,की आपणच राज्याभिषेक केलेल्या बाहुल्याला हटवायचे आणि नवा बाहूल्याला राज्याभिषेक करायचा.जर नवा बाहुला सापडला नाही तर त्या देशाला स्वत:च्या दैवावर सोडुन देयचे. हा या धोरणाचा विस्तार म्हणता येईल. जगभरात अमेरिकेने हेच केले आहे. ईराक, अफगाणिस्तान, व्हिएतनाम, व्हेनिझएला, आणि आता इराण हे त्यातील प्रमुख देश म्हणता येईल.ईराकचे सत्ताधिश सद्दाम हुसेनकडे जगाचा विनाश होईल,असी संहारक शस्त्रे आहेत,अस...

क्वांटम तंत्रज्ञान : भविष्यातील जगाची किल्ली

इमेज
          सध्याचे जग हे तंत्रज्ञांचे म्हणायला सुरवात होऊन आता सुमारे अडीच पिढ्यांचा काळ उलटून गेला आहे . आताचे जग आहे क्वांटम तंत्रज्ञानाचे .   २१ व्या   शतकातील विज्ञानतंत्रज्ञान क्षेत्राचे चित्र पूर्णतः बदलवून टाकणारा शोध म्हणजे क्वांटम फिजि   नेहमीच्या कम्पुटरच्या मर्यादा ओलांडणारी ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी अनेक शास्त्रज्ञांनी अनेक वर्ष   प्रयत्न केले   या शास्त्रज्ञांमध्ये प्रामुख्याने नाव घ्यावेच   लागेल ते म्हणजे .   जॉन क्लार्क , मिशेल एच . डेवोरेट आणि जॉन एम . मार्टिनिस .   यांचे नाव घ्यावेच लागेल किंबहुना या शासत्रज्ञांचे नाव न घेता क्वांटम कम्पुटिंग चा विचार केला तर हाती फक्त आणि फक्त शून्य राहील इतके मोठे योगदान या शास्त्रज्ञाचे आहे .   या तीन शास्त्रज्ञांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे , आणि याच योगदांबद्दल त्यांना २०२५ चा फिजिक्सचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे .   जॉन क्लार्क हे प्रायोगिक...