पोस्ट्स

ऑक्टोबर २२, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शतरंज के हम सिकंदर हमसे आगे ना कोई !

इमेज
        यहाके हम सिकंदर हमसे  ना आगे कोई ! असे एका हिंदी चित्रपटातील गाण्याचे बोल आहेत . जगात  आम्हीच सर्वश्रेष्ठ आहोत . हे जगाला दाखवूंन देण्याच्या पार्श्वभूमीवरचे हे गाणे भारतीय युवा बुद्धिबळपटूंनी  २२ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्षात आणून दिवाळी सण सुरु होण्याच्या आधीच दिवाळी सण साजरा केला आहे , इंडोनेशिया देशातील बाली या शहरात झालेल्या आशियाई युवा बुद्धिबळ विजेतेपद स्पर्धेत विविध प्रकारात मिळून २७ वैयक्तिक आणि १९ सांघिक पदके भारतीय बुद्धिबळपटूंनी मिळवली आहेत या स्पर्धेत एकूण १०८ वैयक्तिक पदके देण्यात आली त्यापैकी अचूक २५ % पदके भारतीय खेळाडूंनी मिळवली हे विशेष  . वैयक्तिक पदकांमध्ये १३ पदके ही सुवर्ण, ६ रौप्य ,आणि ८ कांस्य पदके आहेत .  भारताला सांघिक प्रकारात ८ सुवर्ण , ७ रौप्य , आणि ६ कांस्य पदके मिळाली विविध वयोगटात झालेल्या या स्पर्धेत काही गटात भारताला संघ होण्यसासाठी पुरेसे खेळाडूं नसताना भारतीय खेळाडूंनी हा भीम पराक्रम केला आहे त्याबद्दल भारतीय युवा बुद्धिबळ खेळाडूंचे कौतुक करावे तितके कमीच           भारताने मिळवेललेल्या ४६ पदकांपैकी १० पदके हि कलासिकल  या प्रकारच्या खेळातील आहेत या

पाकिस्तानातील राजकीय भूकंप

इमेज
          इम्रान खान हे कधी सरकारविरोधी आंदोलनांची हाक  देतात याकडे समस्त पाकिस्तानी जनता  डोळ्यात तेल घालून लक्ष देत असताना , इम्रान खान यांनी मी ऑक्टोबर महिन्यातच आंदोलन सुरु करेल असे जाहीर केले असताना शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी  एका नाट्यमय घडामोडीत पाकिस्तानी निवडणूक आयोगातर्फे , इम्रान खान याना ५  वर्षासाठी राजकीय पद  भूषवण्यास  मनाई करणारा निर्णय जाहीर करण्यात आला . पाकिस्तानी संविधानाच्या कलम ६३ च्या उपकलम ३ नुसार पंतप्रधानपदी असतांना देशाला मिळालेल्या भेटवस्तूंची परस्पर विक्री केल्यामुळे देशहिताला काहीशी बाधा उत्पन्न झाली या आरोपाखाली त्यांच्यावर हि कार्यवाही करण्यात आली .या निर्णयामुळे पाकिस्तानी सत्ताधिकारी वर्गाला काहीसी सुखावणारी स्थिती उत्पन्न झाल्याची बातमी या संदर्भात वार्तांकन करताना अल जझीरा या वृत्तवाहिनीने दिले आहे पाकिस्तानी निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानात विविध शहरात लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे          पाकिस्तानी निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सिकंदर सुलतान राजा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित चार सदस्यीय आयोगाने एकमताने हा निकाल दिला . पाकिस्तानी निवडणूक