पोस्ट्स

पुस्तक परिचय लेबलसह पोस्ट दाखवत आहे

जाणून घेऊया पुस्तक वाचण्याच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकांविषयी (भाग ३ )

इमेज
  पुस्तकाच्या विश्वात सध्या मोठ्या प्रमाणात आणि वेगाने बदल होत आहेत. हे बदल पुस्तकाच्या स्वरूपात जसे प्रिंटेड पुस्तक, इ बुक आणि ऑडिओ बुक या सर्वच प्रकारात होत आहेत त्यामुळे पुस्तकाचे वितरण साठवणूक यात देखील मोठया प्रमाणात  बदल होत आहे. या बदलामुळे सध्या आहे त्या प्रकारे प्रकाशकाचे स्थान राहिला का अशा प्रश्न देखील काही प्रमाणात उपस्थित होत आहे. प्रिंटेड पुस्तकाच्या बाबत लेखकाला मेंदू म्हटल्यास ज्याला हृदय म्हणावे लागेल असा घटक म्हणजे प्रकाशक असतो.एकवेळ मेंदू काम करेनासा झाला तरी व्यक्ती कोमात  जाऊन जिवंत राहू शकतो.  मात्र हृदयचे तसे नसते.  हृदयाचा खेळ संपला कि मानवाचा मृत्यू होतो आधुनिक वैद्यकशास्त्र सुद्धा मनुष्याच्या मृत्यू म्हणजे हृदयक्रिया बंद पडणे असे समजते . हे समजून घेतल्यास पुस्तकाच्या बाबत प्रकाशक किती महत्वाचा असतो हे अंजुटे आणि सध्या पुस्तकाच्या क्षेत्रात होणारे बदल या प्रकाशकलालाच बाहेरचा रस्ता दाखवत आहेत यामुळे ते समजून घेणे आवश्यक आहे  तर पुस्तकांच्या क्षेत्रातील हृदयाला अर्थात प्रकाशकला धडकी भरवणारा घटकाचे नाव आहे पुस्तक ऑन डिमांड ज्यात...

कहाणी अथक परीक्षम,जिद्द कष्टाची आणि विनाकारण झालेल्या अपमानाची ....

इमेज
 यावर्षी मी प्रामुख्याने आत्मचरित्र, चरित्र आणि अनुभव कथन विषयक पुस्तकांचे वाचन करणे ठरवले आहे ,हे एव्हना आपणास माहिती झालेच असेल.  मी आतापर्यंत, 'यस आय एम गिल्टी, बलुतं,  उपरा, लोकवन आनंदवन, डायरी ऑफ ऍना फ्रॅंक ही  पुस्तके वाचली आहेत . याच आत्मचरित्र, चरित्र आणि अनुभव कथन विषयक पुस्तकांच्या साखळीत सहजतेने समाविष्ट होऊ शकेल असे पुस्तक, ' कहाणी लंडनच्या आजीबाईची' सुद्धा मी नुकतेच वाचून पूर्ण केले आहे. माझे आजचे लेखन तुम्हाला या पुस्तकाविषयी सांगण्यासाठी  तर वाचक मित्रहो , इंग्रजीचा गंध सोडा, धड मराठी सुद्धा न येणाऱ्या विदर्भातील एका पूर्ण अर्थाने अशिक्षित असणाऱ्या राधाबाई बोरकर,  ज्यांना  लंडन देश आहे की एखादे शहर हे सुद्धा माहिती नाही‌‌. त्यांनी जिद्दीने प्रयत्नपूर्वक आणि कष्टाने उभारलेल्या लंडनमधील सुप्रसिद्ध हॉटेलची कथा या सांगण्यात आली आहे.सरोजिनी वैद्य लिखित १८८ पानी या पुस्तकाचे प्रकाशक आहेत राजहंस प्रकाशन.  कष्ट केले की यश मिळतेच हा संदेश आपणांस या पुस्तकातून मिळतो.  १८ प्रकरणात विभागलेल्या या पुस्तकात आपणास स्वातंत्र्यपूर्व काळात तसेच ...

प्रत्येक कुमारवयीन मुला- मुलीने वाचलेच पाहिजे असे पुस्तक ' यस आय एम गिल्टी'

इमेज
  प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कुमारवयीन टप्पा अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा ठसा त्यांच्या पुढील संपूर्ण आयुष्यावर राहतो. या काळात जर त्यास योग्य संगत न मिळण्यास त्याचे दुष्परिणाम संबधित व्यक्तीलाआयुष्यभर भोगावे लागतात. आयुष्याचे सोने किंवा मातेरे करण्याची ताकद या कुमारवयीन आयुष्यात घडणाऱ्या घटनांमध्ये असते.व्यक्तीला जगाची ओळख  होण्याच्या या काळातील एखादे चुकीचे पाऊल आयुष्याचा नाश करायला पुरेसे असते .असे सातत्याने म्हंटले जाते.आणि या विधानाची साक्ष आपणास पटते ती, मुनव्वर शाह लिखित आणि निराली प्रकाशनतर्फे प्रकशित  ' यस आय एम गिल्टी'   या २०० पानी पुस्तकातून.  वाचक मित्र,मैत्रीणीनो इसवी सन २०२६ या वर्षात माझ्या वाचनाचा रोख प्रामुख्याने आत्मचरित्र,  चरित्र आणि अनुभव कथन असलेल्या पुस्तकांवर असणार आहे, हे एव्हाना तुम्हाला माहिती झालेच असेल. तर याच साखळीतील एक पुस्तक म्हणून मी हे एका गुन्हेगाराचे अनुभव कथन वाचले. संपूर्ण महाराष्ट्रात त्यातही पुणे शहरात एके काळी खूप चर्चेत असलेल्या जोशी - अभ्यंकर खून खटल्यातील आरोपी...

समाजाचे दाहक चित्र दाखवून देणारे पुस्तक 'बलुतं'

इमेज
 मी या २०२६ वर्षी प्रामुख्याने आत्मचरित्र,चरित्र वाचण्याचे ठरवले आहे, हे एव्हाना तुम्हाला माहिती झालेच असेल. तर याचा मालिकेत समाविष्ट होणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, दया पवार लिखित 'बलुतं' हे सुप्रसिद्ध विद्रोही साहित्यातील महत्त्वाचे आत्मचरित्र मी नुकतेवच वाचले. समाजाचे दाहक चित्र दाखवून देणारे पुस्तक 'बलुतं' असे त्याचे एका वाक्यात वर्णन करता येईल आपल्याच समाजातील एका घटकाचे आयुष्य किती त्रासदायक आणि कष्टकरी होते याचे मन सुन्न करणारे वर्णन सुमारे २०० पानी पुस्तकात आहे.समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे स्वच्छतेचे काम करून सुद्धा समाज आपल्यातील एकाला कोणत्या प्रकारे हीन वागणूक देत होता हे या पुस्तकाच्या वाचनातून मला पुन्हा एकदा समजले.  मी एस पी कॉलेजमध्ये शिकत असताना किबे थेटरमध्ये 'तुरुंग देश' हा माहितीपट बघितला होता.त्यावेळी पडद्यावर बघितलेली दाहकता मी या पुस्तकातून पुन्हा एकदा अनुभवली असे म्हंटल्यास वावगे ठरणार नाही. 'हीच आमुची प्रार्थना, माणसाने माणसाशी माणसा सम वागणे, हे का आवश्यक आहे हे या आतमचरित्रामुळे मला समजले.  शून्यातून विश्व निर्माण करणारा लेखक म्हण...

समाजाच्या एका भीषण वास्तवाचे वास्तविक स्वरूप दखवणारे पुस्तक. 'उपरा'

इमेज
 पुस्तकाचे विविध प्रकार असतात जसे कथासंग्रह कांदबरी नाटक वगैरे हे आपणाला माहिती असेलच.  या प्रत्येक प्रकारचे काही फायदे तोटे आहेत. त्यातील चरित्र या प्रकारचा विचार  केला असता आपणास मोठ्या प्रमाणात सकारात्मकता मिळू शकते अरे या व्यक्तीने इतक्या अडचणीतून प्रवास केला आहे आपल्या अडचणी तर यापुढे अतिशय शुल्लक आहेत आपण परिस्थिती बदलण्यास प्रयत्न केलाच पाहिजे  हा विचार आपणास चरित्र आणि आत्मचरित्र वाचनातून मिळू शकतो. तसेच चरित्रे वाचल्यास आपणास दुसऱ्याच्या संघर्षाचे ज्ञान होत असल्याने जर एखादा व्यक्ती संघर्ष करत असल्यास संघर्ष करत असलेल्या व्यक्तीविषयी काहीसे ममत्व देखील निर्माण होते असे अनेक मानस शास्त्रज्ञ सांगत असतात  याशिवाय ज्या व्यक्तीने चरित्र किंवा आत्मचरित्र लिहले आहे त्या व्यक्तीने ते लिहताना त्या व्यक्तीला  समाजातील विविध समाजघटकांचा त्यास काय अनुभव आलाया विषयी देखील लिहले असते  त्या अर्थाने चरित्रे आत्मचरित्रे समाजाचा आरसा देखील ठरतात. चरित्र वाचनातून होणारे हे फायदे लक्षात घेत या २०२६ अर्शी माझ्यावाचनाला काहीसे वळण लागावे म्हणून य वर्षी जास्तीत जास्...

जाणून घेवूया पुस्तक वाचनाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकाविषयी ( भाग 2)

इमेज
  पुस्तकाच्या विश्वाचा विचार करता प्रमुख घटक असलेल्या वाचक आणि प्रकाशक या मुख्य मुद्यांच्या अवतीभोवती फिरणारे अनेक घटक आहेत मात्र त्यांची चर्चा होईलच असे नाही किंबहुना  त्यावर चर्चा करायची गरजच ती काय असा सूर सहजतेने उमटू शकतो. मात्र पुस्तकाच्या विश्वच सविस्तर आढावा घेयचा असल्यास ते आवश्यक ठरतात. त्यातील वर्तमानपत्रात प्रसिद्ध होणाऱ्या भागाविषयी आणि टीव्हीवर आणि युट्युब वरील अस्तित्वाविषयी आपण लेखाच्या पहिल्या भागात बघितले होते या दुसऱ्या लेखात आपण पुस्तकाविषयीची ऍप्लिकेशन आणि सोशल मीडियावरील अस्तित्व या विषयी बोलूया .            तर वाचक मित्रानो पुस्तकाबविषयीचे हे विश्व अगदी मराठी भाषेचा विचार करता देखील अत्यंत  समृद्ध आहे सोशल मीडियात त्यातही प्रामुख्याने टेलिग्राम मध्ये पुस्तकविषयीचे अनेक ग्रुप आहेत.  ज्यावर पुस्तकाच्या पीडीएफ मोठ्या संख्येने शेअर केलेल्या असतात त्यामुळे आपण सहजतेने विविध पुस्तके वाचू शकतो अर्थात प्रत्यक्ष प्रिंटेड पुस्तक वाचण्याची मजा यामध्ये येत नसली तरी दुधाची तहान ताकावर या वाक्यप्रचारानुसार हे ही नसे थोडके. व्हाट...

जाणून घेवूया पुस्तक वाचनाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकाविषयी ( भाग 1)

इमेज
शीर्षक वाचून गोंधळलात का? हा कोणत्या घटकाविषयी बोलणार आहे,असा प्रश्न तूम्हाला पडलेला असेल तर पहिलेच सांगतो मी बोलणार आहे, विविध वर्तमानपत्रात येणाऱ्या 'नव्या पुस्तकाची ओळख' आणि 'मी वाचलेले पुस्तक' या सारख्या शीर्षकाखाली प्रसिद्ध होणाऱ्या लेखाविषयी तसेच पुस्तकाविषयी सांगणाऱ्या  टीव्हीवरील वेगवेगळ्या  चॅनेलवरील कार्यक्रम अणि युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओविषयी‌.सर्वसाधरणपणे पुस्तक म्हटले की प्रकाशक, वाचक याविषयी बोलले जाते, असा माझा अनुभव आहे.म्हणून म्हटले पुस्तक वाचनाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकाविषयी तर वाचक मित्रांनो, टिव्हीवर पुस्तकावरील कार्यक्रमाचा विचार करता समोर येणारे चित्र काहीसे निराशाजनक आहे.डी.डी. सह्याद्री आणि डि.डी.इंडीया या सारख्या सरकारी चॅनलचा अपवाद वगळता इतर ठिकाणी पुस्तकाविषयी फारसे कार्यक्रम मला तरी आढळत नाही.नाही म्हणायला न्युज 18 मराठी जेव्हा आय.बी.एम लोकमत होते, त्यावेळी त्यावेळी ' वाचाल तर वाचाल' हा साप्ताहिक कार्यक्रम होत असे.केतकी जोशी या वृत्तनिवेदिका तो सादर करत असे. त्याचा अपवाद वगळता इतर खासगी वाहिनीवरील पुस्तकाविषयीचे मराठी भाषेतील क...

जाणून घेवूया पुस्तक वाचनाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकाविषयी

इमेज
शीर्षक वाचून गोंधळलात का? हा कोणत्या घटकाविषयी बोलणार आहे,असा प्रश्न तूम्हाला पडलेला असेल तर पहिलेच सांगतो मी बोलणार आहे, विविध वर्तमानपत्रात येणाऱ्या 'नव्या पुस्तकाची ओळख' आणि 'मी वाचलेले पुस्तक' या सारख्या शीर्षकाखाली प्रसिद्ध होणाऱ्या लेखाविषयी तसेच पुस्तकाविषयी सांगणाऱ्या  टीव्हीवरील वेगवेगळ्या  चॅनेलवरील कार्यक्रम अणि युट्यूब चॅनेलवरील व्हिडीओविषयी‌.सर्वसाधरणपणे पुस्तक म्हटले की प्रकाशक, वाचक याविषयी बोलले जाते, असा माझा अनुभव आहे.म्हणून म्हटले पुस्तक वाचनाच्या मुख्य प्रवाहात नसणाऱ्या घटकाविषयी तर वाचक मित्रांनो, टिव्हीवर पुस्तकावरील कार्यक्रमाचा विचार करता समोर येणारे चित्र काहीसे निराशाजनक आहे.डी.डी. सह्याद्री आणि डि.डी.इंडीया या सारख्या सरकारी चॅनलचा अपवाद वगळता इतर ठिकाणी पुस्तकाविषयी फारसे कार्यक्रम मला तरी आढळत नाही.नाही म्हणायला न्युज 18 मराठी जेव्हा आय.बी.एम लोकमत होते, त्यावेळी त्यावेळी ' वाचाल तर वाचाल' हा साप्ताहिक कार्यक्रम होत असे.केतकी जोशी या वृत्तनिवेदिका तो सादर करत असे. त्याचा अपवाद वगळता इतर खासगी वाहिनीवरील पुस्तक...

जगाच्या अर्थकारणावर मोठा परिणाम करणाऱ्या शहराची सैर घडणारे पुस्तक ' न्यूयॉर्क'

इमेज
                आपल्याकडे ज्या ज्या गोष्टीमूळे शहाणपण येते असे संगितले जाते त्यामध्ये पर्यटन , फिरण्याच देखील समावेश होतो. अर्थात प्रयेकाचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. प्रत्येकाची आर्थिक स्थिती वेगवेगळी असते .तसेच जग एव्हढे मोठे आहे की,पण राहतो तो आंणि त्याला लागून असलेले ४ ते ५ जिल्हे जरी फिरायचे म्हंटले तरी एक ते दोन वर्ष सहज लागू शकतात. (आता अति परिचयात अवज्ञा किंवा  आपण लांबचे एरिया आधी बघू . हा भाग काय जवळचा आहे कधीही बघता येईल,असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले तर भाग वेगळा ) तरी दुसरे  देश किमान राज्य बघयाला घेरतले तर सारा आयुष्य देखील पुरणार नाही . मग याला ऊत्तर ते काय ? तर दुसऱ्याच्या अनुभवातून फिरायचे . म्हणजेच दुसऱ्या व्यक्तीने लिहलेल्या प्रवास वर्णनातून एखादा प्रदेश समजून  घेयचा   माझे प्रवासाचे हकीगत' हे आपल्या मराठीतील पहिले प्रवासवर्णन. या पहिल्या प्रवासवर्णनानंतर अनेकांनी आपल्या प्रवास्यांची वर्णन लिहून आपल्या मराठीत हा प्रकार मोठ्या प्रमाणात रुजवला आहे. पु. ल देशपांडे, मीना प्रभू या लेखकांनी हा प्रकार मराठी...

मी कोणती पद्धत वापरुन पुस्तके निवडतो (माझे वाचन भाग ८)

इमेज
  माझ्या कालच्या लेखावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या त्याबाबद्दल माझा लेख वाचणाऱ्या,यावर प्रतिक्रिया देणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन. या प्रतिक्रियांमध्ये एकाने  मला विचारले होते की, अजिक्य  कोणती पद्धत वापरून पुस्तके निवडतो . म्हणजे तू माहितीवर पुस्तके मोठ्या संख्येने वाचतो. हे माहिती आहे मात्र विविध विषयावरची माहिती देणारीं पुस्तक असताना,  एखादे  पुस्तक वाचायचे किंवा एखादे पुस्तक वाचायचे नाही हे तू कोणते निकष वापरून ठरवतो हे मला जाणून घेयला आवडेल. तर माझे आजचे लेखन याच प्रश्नाच्या उत्तरासाठी तर मित्रानो माझ्या पुस्तक निवडण्याचे दोन निकष आहेत .पहिला निकष आहे लेखकाचा तर दुसरा निकष आहे विषयाचा. मी माझे वाचन भाग ४  मध्ये सांगितल्याप्रमाणे माझे आवडते  लेखक आहेत अच्युत गोडबोले आणि गिरीश  कुबेर. (आता मला ते लेखक की आवडतो हे ज्यांना माहिती करायचे असेल त्यांनी या लेखालिकेचा भाग क्रमांक ४ वाचावा.त्या ठिकणी मी हा मुद्दा सविस्तर मांडल्याने तो पुन्हा इथे मांडत नाही ) या दोन्ही लेखकांनी नवीन काही लिहले कि ते वाचण्यास माझी पहिली पसंती आहे मी आतार्यंत अच्युत...

वाचनाची इच्छा आहे पण ... (माझे वाचन भाग क्रमांक ७ )

इमेज
 मला अनेक व्यक्ती  अश्या भेत ट असतात ,ज्या  मला सांगत असतात अरे अजिंक्य काय आहे ना आम्हाला वाचायला आवडते. पूर्वी मी देखील तुझ्यासारखी अनेक पुस्तके  वाचली आहेत.पण आता काय हे ना ? रोजचा दिवस एर्व्हढा बिझी जातो ना की,वाचायला वेळच भेटत नाही. पण मी वाचणार आहे /कोणी मला असे सांगितले कि मला हसायला येते. जर अय वे मिळत नसेल तर पुढे भविष्यात काय चमत्कार होणार आहे ज्यामुळे त्यांना वाचायला वेळ मिळणार आहे हे त्यांचं त्यांनाच माहिती असो   माझे म्हणाल तर माझ्या बँगमध्ये नेहमी एक पुस्तक असतेच जर कोणाला भेटायला गेलो आंणि त्या ठिकाणी व्यक्ती भारतीय प्रमाणवेळेला जागून उशिरा आली तर मोबाईल बघण्यापेक्षा मी पुस्तक वाचायला सुरुवात करतो.  मी घरापासून दूर राहत असल्याने मेसमध्ये जेवतो  त्यावेळेस सुद्धा मेसमध्ये नंबर येण्यापर्यंत वाचू शकतो मी माझे उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपात दिले आहे .आपण आपल्या  रुटीन प्रमाणे यात बदल करू शकतात. ऑफिसमध्ये चहा पिणे जेवण करतो या वेळेस सादर गोष्ट लवकर करुंन आपण वाचण्यास सुरवात करू शकतो. एखादा व्यक्ती प्रवाश्यात वाचू शकतो .एखादा...

मानववतेच्या तिर्थस्थानाची माहिती देणारे पुस्तक "आनंदवन प्रयोगवन'

इमेज
  जे दुःखी, कष्टी आणि पीडित आहेत, त्यांना जो माणूस आपलं मानतो, तोच खरा साधू (संत) आहे आणि त्याच्या ठिकाणीच देव वास करतो हे सांगणारा संत तुकाराम यांचा  'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा' हा अभंग सुरसिद्ध आहे.अभंग सुप्रसीद असला तरी प्रत्यक्षात त्या प्रमाणे वागणारे हाताचा बोटावर मोजता येतील इतकेच लोक आचरण करत असल्याचे आपणास सहज दिसते. या मोजक्या लोकांमध्येच मोजता येतील असे महान व्यक्तिमत्व म्हणजे बाबा आमटे होय. बाबा  आमटे यांनी कुष्ठरोगी, दिव्यांग, वनवासी व्यक्ती आणि यासारख्या समाजातील मूळ प्रवाहापासून दूर गेलेल्या नागरिकांना समजाजच्या मूळ प्रवाहात आणण्यसासाठी  लोक बिरादरी, हेमलकसा, आनंदवन सोमनाथ आदी प्रकल्प उभारले आहेत . या प्रकल्पाची माहिती देणारी पुस्तकेसुद्धा प्रसिद्ध आहेत अश्याच प्रसिद्ध असणाऱ्या पुस्तकांपैकी एक  म्हणजे बाबा आमटे यांचे सुपुत्र असलेल्या डॉ विकास आमटे यांनी लिहलेले "आनंदवन लोकवन हे पुस्तक .या पुस्तकात  डॉ विकास आमटे  "आनंदवन चा इतिहास उलगडला आहे .हे पुस्तक मी नुकतेच वाचले    ...

अनुभवकथन, एका कुमारवयीन प्रगल्भ मात्र योग्य संधी न मिळालेल्या लेखिकेचे, 'डायरी ऑफ ऍना फ्रॅंक'

इमेज
  पुस्तकाची दुनिया मोठी  अफलातून आहे. पुस्तक लेखनाचा प्रत्येक प्रकार आपणस काहीतरी शिववून जातो .ना सी फडके यांनी मराठीत मोठ्या प्रमाणात रुजवलेला निबंध असे म्हणतात तो आपल्या विचारशक्तीला चालना देतो. उत्तम काव्य 'आपणास शब्दाची जादू उलगडून सांगते. कथा कादंबरी हा प्रकार आपले ऊत्तम मनोरंज करतो  तर चरित्र तसेच  आत्मचरित्र हा प्रकार आपणस  आयुष्यचं सुखदुःख सांगतो.  एखाद्या कठीण स्थितीत प्रतिभावान माणसे कोणत्या प्रकारे स्थिर चित्र राहिली. . त्यांना याचे काय फळ मिळाले ?  हे आपणास समजते. त्यामुळे आपण देखील जर आपणावर तशी स्थिती उद्भवलीच तर शांत राहायचे हे समजून घेऊ शकतो तसेच दुसऱ्याचे दुःख समजून घेण्याची आपली मानसिकता  तयारहोण्यासाठी आतमचरित्रे ,चरित्रे मदत करतात असे अनेक मानस शास्त्रज्ञाचे मत आहे, याचा अनुभव घेण्यासाठी या २०२६ वर्षी मी अधिकाधिक चरित्रे आणि आतमचरित्रे वाचण्याचे ठरवले आहे. तर या विशिष्ट हेतू ठेवून सुरु केलेल्या या २०२६ च्या वाचनातले पहिले पुस्तक मी नुकतेच वाचले. ते होते   'डायरी ऑफ ऍना फ्रॅंक'           डायरी ...

लाईट.. ‌कॅमेरा.... ॲक्शन

इमेज
विविधतेने नटलेल्या आपल्या भारतात इथे दर बारा मैलावर  भाषा बदलते असे सांगण्यात येते. जो देश जगातील सातवा मोठा देश आहे. आणि ज्या देशाच्या अधिकृत अशा 22 भाषा आहेत. तसेच जगातील बहुतेक सर्व प्रमुख धर्माचे लोक ज्या भारतात राहतात. अश्या खंडप्राय देशाला ज्या तीन गोष्टी जोडतात त्यातील एक गोष्ट म्हणजे चित्रपट. ज्याची ओळख होते तीन शब्दातून. 'लाईट कॅमेरा ॲक्शन' हे तीन शब्द ऐकल्यावर आपल्या समजते येथे कोणत्यातरी मालिकेचे अथवा चित्रपटाचे चित्रकरण सुरू आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या विचार केला असता जगात 210 देश आहेत. या प्रत्येक देशात काही प्रमाणात चित्रपट निर्मिती होते. मात्र या 210 देशांमध्ये सर्वाधिक चित्रपट निर्मिती होते ती आपल्या भारतात. त्यामुळे जगात चित्रपट निर्मितीत काय सुरू आहे? आपण काय करतो आहोत? याची माहिती असणे हे आवश्यक ठरते, आणि ही माहिती मिळते विविध ठिकाणी होणाऱ्या चित्रपट महोत्सवात. या चित्रपट महोत्सवात वेगवेगळ्या देशांचे वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट एकाच छताखाली दाखवले जातात. त्यामुळे चित्रपट रसिकांना चित्रपट निर्मितीसाठी कोणते तंत्र वापरले जाते ? आपण कोणते तंत्रज्ञान...

खगोलशास्त्रातील काही बेसिक कंसेप्ट सहजसोप्या भाषेत स्पष्ट करणारे पुस्तक 'स्पेस ट्रॅव्हल'

इमेज
  रात्री प्रवास करताना, मानवी वस्तीपासून दुर, जिथे लाईटची अडचण नाहीये,अस्या ठिकाणी आपण प्रवासादरम्यान थांबलो आणि वर आकाशात बघीतले तर आपणास असंख्य तारे ग्रह,उपग्रह दिसतात. आपल्या मनुष्याला याचे पार अश्मयुगापासून आकर्षण. मात्र विसाव्या शतकाच्या शेवटच्या पन्नास वर्षात मनुष्याचे याविषयीचे गुढ बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी झाले त्याला कारणामुळे होते या काळात झालेली प्रगती.  जगातील सर्वात श्रीमंत असणारा एलोंड मास यांच्या स्पेस एक्स या कंपनीत मार्फत काही प्रमाणात सुरू करण्यात आलेली अवकाश पर्यटन हे या प्रगतीचेच सध्याचे स्वरूप किंवा भारताचे आदित्य एलवन मिशन असो तर गणयान मिशन असो ही सुद्धा याचेच काही उदाहरणे. हा प्रवास कसा झाला याची कहाणी मोठी रंजक आहे आणि आपल्याला ही माहिती करून घ्यायची असेल तर मराठी ज्ञानभाषा हवी यासाठी मराठीमध्ये अनेक विषयांवर माहितीपूर्ण तरी रंजक भाषेत पुस्तके लिहणाऱ्या अच्युत गोडबोले यांनी लिहिलेले ट्रॅव्हल हे पुस्तक आपणास उपयोगी ठरते मी काही दिवसापूर्वीच हे पुस्तक वाचले.  या पुस्तकात ३२३ पानातून १२ प्रकरणाद्धारे पृथ्वीचे वातावरण नक्की कुठे संपते,आणि अंतराळ सुरु ...

भारतीयांना आपल्या प्राचीन वैभवशाली वारस्याची जाणीव करून देणारे पुस्तक 'सहा सोनेरी पाने'

इमेज
  मानसशास्त्रात व्यक्ती स्वतःच्या विषयी जो काही विचार करते, त्यानुसार तिचे व्यक्तिमत्त्व घडते, असा एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार जर व्यक्तीने स्वतः विषयी नकारात्मकच विचार केला तर व्यक्तीचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात कमी होतो आणि व्यक्तीमध्ये काही कारण नसताना स्वतः कमीपणा घेऊन दुसऱ्याला, त्याची त्या प्रकारची योग्यता नसताना देखील, मोठेपणा देतो. “मी कायमच हरण्यासाठीच जन्म झालेला आहे. मी पूर्वी कधीही जिंकलो नव्हतो; भविष्यात देखील जिंकू शकणार नाही” असे त्या व्यक्तीला वाटायला लागते. व्यक्तीला कायम त्याची चूकच सांगितल्या, त्याच्या चांगल्या बाबींची जाणीवच त्याला करून दिली नाही तर व्यक्तीमध्ये या प्रकारची मानसिक विकृती निर्माण होते, असे या सिद्धांताबाबत मानसशास्त्रज्ञ सांगतात. त्यावेळी त्या व्यक्तीला त्याच्या पूर्वायुष्यातील सकारात्मक बाबी सांगाव्या लागतात. कोणताही समाज हा व्यक्तींचा समूहच असतो. जर एखाद्या व्यक्तीसमूहातील बहुसंख्य व्यक्तींना असे न्यूनगंडाने ग्रासले तर तो समाज एकत्रितपणे नकारात्मक विचार करायला लागतो. अशा वेळी या लेखाच्या सुरुवातीला व्यक्तीबाबत सांगितले तसेच या समाजाबाब...

शोध एक प्रगल्भ आणि विक्षिप्त व्यक्तिमत्त्वाचा 'प्यासा'

इमेज
काही व्यक्तिमत्त्वे मोठी विलक्षण असतात. त्यांच्या विषयी कितीतरी वेळा, कितीतरी वेळ बोलत राहिलो. लिहीत राहिलो तरी दरवेळी त्यांच्याविषयी काय लिहायचे ,काय बोलायचे याचा विचार केला तर दरवेळी कोणतातरी वेगळा मुद्दा , व्यक्तिमत्त्वातील आतापर्यंत फारशा चर्चित ना गेलेला पैलू आपणस गवसतो . आणि आपल्याला या  व्यक्तिमत्त्वाची पूर्ण माहिती झाली आहे.असे वाटत असताना आपणाला या व्यक्तीची पुरेशी माहिती नाही याची जाणीव होते. आज ३० नोव्हेंबर २०२५ रोजी  रात्री साडेदहाच्या सुमारास हा मजकूर लिहीत असताताना  ज्यांचे निधन होऊनच ६० वर्ष झाली आहेत, तरी   ज्यांचा उल्लेख केल्याशिवाय बॉलिवूवंडचा इतिहासच लिहिता येणार नाही.  किंबहुना त्यांना  वगळून इतर सर्व व्यक्तींची माहिती लिहिली तरी त्या इतिहासाची किंमत सकाळी शौचास बसण्यासाठीचा कागद अशीच करावी लागेल असे बॉलिवूवडमधील सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक, सिने निर्माते, सिने अभिनेते, सिने दिग्दर्शक असा सर्वच क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या वसंतकुमार शिवशंकर पदुकोण उपाख्य गुरुदत्त यांचा समावेश  अश्याच काही विलक्षण व्यक्तिमत्वांमध्ये करावा लागेल....