पोस्ट्स

ऑक्टोबर १८, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रेन रेन गो अवे !

इमेज
            इंग्रजीत एक बालगीत आहे "रेन रेन गो अवे , लिटिल मीना वाँटस् टु प्ले"  या बालगीतातील बालिका तीला खेळायला मिळावे,  म्हणून पावसला जाण्यास सांगते अशी कवी कल्पना आहे . मात्र खेळण्यासाठी नव्हे तर  रोजच्या जीवनाची रहाटगाडी चालण्यासाठी  रेन रेन गो  अवे ! म्हणण्याची  केरळच्या जनतेवर आली आहे . केरळमध्ये पावसाने  उच्छाद मांडला  असून  मजकूर लिहण्यापर्यंत पावसाने ३१ जणांना पावसामुळे प्राणास मुकावे लागले आहे . केरळच्या बहुतांश भागात पावसाचा अति धोकादायक समजला जाणारा रेड  अलर्ट जाहीर करण्यात आला असून अन्य भागात तुलनेने काहीशा सौम्य असणारा ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे . पंतप्रधान नरेंद्र  यांनी देखील ट्विटरवर  केरळच्या नैसर्गिक संकटाबाबत संवेदना स्पष्ट केली आहे . नॅशनल डिझास्टर रिलीफ फोर्स (NDRF ) आणि लष्कराच्या तुकड्यांमार्फत केरळमध्ये बचावाचे कार्य जोरात सुरु आहे .मान्सुमच्या पावसाच्या अखेरच्या टप्यातील पावसाने केरळची ही दैनावस्था केली आहे . (नेहमीच्या वेळापत्रकानुसार 1सप्टेंबररोजी मान्सुम पंजाबमधून परतण्यास सुरवात करतो..आँक्टोबरचा 5ते15 तारखेपर्यत मान्सुम महाराष्ट्रातून मा