पोस्ट्स

नोव्हेंबर २५, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जरा याद करो उनकी ..........

इमेज
                26 नोव्हेंबर हा एक दिवस नाहीये . भारताच्या  एक ठसठशीत जखमेचा तो दिवस आहे. 2008 नोव्हेंबर. 26 समुद्रमार्गे पाकिस्तानातून 10 अतिरेक्यांनी मुबंईत घातलेल्या धुमाकुळाचा दिवस . आज 2020 साली या दहशतवादी हल्ल्याला 12 वर्षे पूर्ण झाली . वैद्यकशास्त्राचा विचार करता , सध्या आपल्या शरीरात असणाऱ्या  सर्व पेशी  नष्ट होऊन  पूर्णतः नवीन पेशी अस्तित्वात येण्यासाठी 12 वर्षे  लागतात .  या न्यायाने या हल्याचा वेळी आपल्या शरीरात असणाऱ्या पूर्व पेशी आता नष्ट झाल्या आहेत . मात्र त्यावेळी झालेले मानसिक घाव अजूनही भरून आलेले नाहीत . इतका हा हल्ला मोठा होता .             या हल्ल्याचे पूर्ण नियोजन करून हा हल्ला झाला होता . याची साक्ष त्यांनी दिवस निवडण्यापासून होते .26 नोव्हेंबर या दिवशी आपण संविधान दिन  म्हणून साजरा करतो. त्याच्यावर हल्ला व्हावा,  हा यामागचा प्रमुख हेतू होता . त्यांनी प्रचंड प्रमाणात दारुगोळा देखील आणला होता , त्यावेळचा अत्याधुनिक दळणवळण  सोयीसुविधा त्यांनी वापरले होते . त्याचा जोरावर त्यांनी सलग तीन दिवस रात्र आपल्या सैन्यावर प्रचंड हल्ला केला . त्यांनी त्यासाठी मुंबईची अर्थात