पोस्ट्स

नोव्हेंबर २९, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

एक देश एक निवडणूका ! एक अप्रकाशित बाजू

इमेज
                          पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील केवाडिया येथे राज्य विधानसभेच्या अध्यक्षांच्या परिषदेत बोलताना  एक राष्ट्र एक निवडणूक हे देशात राबवणे आवश्यक असल्याचे सांगितल्याने एक राष्ट्र एक निवडणूक या संकल्पनेवर पुन्हा एकदा  विचारमंथन सुरु आहे . मी टीव्हीवर या संदर्भात ज्या बातम्या बघितल्या त्यामध्ये  ही संकल्पना स्पष्ट करताना माध्यमांकडून निवडणुका राबवण्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेवर ज्यात प्रामुख्याने शिक्षकवर्ग आदींचा समावेश होतो , त्यांच्यावर येणाऱ्या ताणाबाबत तसेच निवडणुकीसाठी लागणाऱ्या प्रशासनिक  खर्चाबाबत फक्त भाष्य केले आहे .  जे या प्रश्नाची फक्त एकच बाजू दशर्वते . प्रत्येक प्रश्नाला दोन बाजू असतात ,   त्यातील दुसऱ्या बाजूचा लेखाजोखा मांडण्यासाठी लेखनप्रपंच ही  संकल्पना राबवताना येणाऱ्या अडचणींमध्ये . घटनेमुळे येणाऱ्या अडचणी आणि राबवण्यात येणाऱ्या यंत्रणेमुळे येणाऱ्या अडचणी अश्या दोन प्रकारे आपण विभागणी करू शकतो . प्रथमतः घटनेमुळे येणाऱ्या अडचणीबाबत बघूया .  ही  संकल्पना राबवायची असल्यास राज्यांच्या संदर्भात असणाऱ्या अनेक कलमामध्ये आपणाला दुरुस्ती करावी लागेल

भारतीय रेल्वे झपाट्याने कात टाकताना

इमेज
          मित्रानो , भारतीय रेल्वे सध्या प्रकाशाला लाजवेल या वेगाने कात टाकत असल्यानेच आपणास माहिती असेलच.खचितच असा एखादा आठवडा जातो , ज्यामध्ये भारतीय रेल्वेविषयी एकही बातमी चर्चस येत नाही . केंद्र सरकारच्या सर्वाधिक वेगाने घडामोडी ज्या मंत्रालयात घडतात ते मंत्रालय म्हणजे रेल्वे मंत्रालय , असे म्हटल्यास  अतिशोयोक्ती होणार नाही . दर आठवड्यात किमान एकतर रेल्वे विषयक बातमी ही कानावर येतेच , गेल्याच आठवड्यात तीन घडामोडी घडल्या .  मात्र पारंपरिक माध्यमातून या विषयी फारसे सांगण्यात न आल्याने त्या विषयी सांगण्यासाठो आजचे लेखन             तर मित्रानो प्रदूषण कमी व्हावे या हेतूने भारतीय रेल्वे आपल्या सर्व मार्गाचे वेगाने विद्युतीकरण करत आहे . हे आपणास माहिती आहेच . त्याच  कार्यक्रमातर्गत चालवलेल्या  उपक्रमामुळे रेल्वेचा पश्चिम मध रेल्वे हा विभाग पूर्णतः विद्यतीकरण झालेला पहिला विभाग झालेला आहे , तर उत्तर पश्चिम विभागात असणाऱ्या राजस्थानातील दिल्ली ते जयपूर आणि जयपूर ते अजमेर या दोन महत्त्वाच्या  मार्गाचे विद्युतीकरण नुकतेच पूर्ण केले आहे . त्याचबरोबर पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागांतर्गत य