पोस्ट्स

जानेवारी ५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वे..... वेगाने बदलाच्या वाटेवर

इमेज
       भारतीय रेल्वे, सध्याचा काळातील केंद्र सरकारचा सर्वात जास्त वेगाने बदलत जाणारा उपक्रम. दर आठवड्यात किमान तरी बातमी ही भारतीय रेल्वेतील बदलांविषयी असतेच. काही बदल तात्कालीक असतात, तर काही दुरगामी परीणाम करणारे असतात. या बदलांच्या मालिकेत गेल्या आठवड्यात 3 बदलांची भर पडली, त्याविषयी सांगण्यासाठी  आजचे लेखन.      तर मित्रांनो, रेल्वेच्या गाड्यांबरोबर प्रवास करणाऱ्या स्टाफविषयी अर्थात रनिंग स्टाफ(ज्यामध्ये रेल्वे इंजिनाचे चालक, रेल्वे गार्ड , डब्यात तिकीट तपासणारे, पेंट्री कारचे कर्मचारी, काही संवेदनशील भागात रेल्वेमध्ये सुरक्षा देणारे सुरक्षा दले यांचा समावेश होतो). विषयी मोठे परीणाम करणारे दोन बदल रेल्वेमध्ये गेल्या आठवड्यात जाहिर करण्यात आले तर एक  प्रवाश्यांसदर्भात एक बदल झाला. तर मित्रांनो, आता पर्यत रेल्वे इंजिनात शौचालयाची सोय नव्हती, त्यामुळे रेल्वे इंजिन चालकांची मोठी कुचंबना होत असे.  यावर आता तोडगा काढण्यात आला आहे. भारतीय रेल्वे इंजिनाची निर्मिती करणाऱ्या डीझेल लोकोमोटिव्हि वर्क्स वाराणसी (जो डि एल डब्ल्यु वाराणसी या नावाने प्रसिद्ध आहे ) या कारखन्यामार्फत या पुढे निर्मा

आपली यस्टी कात टाकती आहे!

इमेज
महाराष्ट्राची एसटी , भारतातील पहिले राज्य परीवहन महामंडळ , भारतात सार्वजनिक परीवहन सुरु होण्यास कारणीभूत ठरलेल्या 1956 चा भारतीय सार्वजनिक परीवहन कायदा अस्तिवात येयचा आधी तब्बल 8 वर्षे आधी अस्तिवात आलेले राज्य परीवहन महामंडळ, भारताला 1984 साली पहिल्यांदा आरामदायी प्रवाशाची अनुभुती देणारे राज्य परीवहन महामंडळ, इलेक्ट्रीक  बसेसचा समावेश आपल्या ताफ्यात करणारे देशातील पहिले राज्य परीवहन महामंडळ म्हणजे आपली महाराष्ट्राची एसटी  तर ही आपली एसटी सध्या विशेष चर्चेत आहे, ते कारण म्हणजे  आपल्या एसटीच्या विविध डेपोकडून चालवण्यात येणाऱ्या सहली . नाही म्हणायला या प्रकारच्या सेवा आपल्या एसटीकडून या आधीपण देण्यात येत होती. पण ती सेवा पुणे, मुंबई, औरंगाबाद,नागपूर  या सारख्या शहरातील डेपोकडूनच चालवण्यात टकंयेत होती, मात्र आता शिरपूर (जिल्हा धूळे), कोपरगाव, शेवगाव , श्रीगोंदे (जिल्हा अहमदनगर) सारख्या ग्रामीण भागातील एसटीच्या डेपोकडून शिरपूर घूष्णेश्वर मंदीर अंजिठा-वेरूळ आणि परत शिरपूर , तसेच शिरपूर त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, सप्तशृंगी देवी मंदिर आणि परत शिरपूर सारख्या सहलींचे आयोजन करण्यात येत आहे. येथे