पोस्ट्स

डिसेंबर २६, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सिंहावलोकन २०२२ नैसर्गिक आपत्ती

इमेज
ग्रेनीयन वर्ष २०२२ संपायला आता मोजकेच दिवस राहिलेले आहेत या सरत्या वर्षाचा विचार नैसर्गिक आपत्तीच्या दृष्टीने केला असता आपणास या वर्षात आपणास अनेक नैसर्गिक आपत्ती आल्याचे दिसून येते या आपत्तीचे आपण हवामान बदलामुळे आलेल्या आपत्ती आणि पृथ्वीच्या भूगर्भातील विविध घटकांच्यामुळे मानवास सामना करावयास लागलेल्या नैसर्गिक आपत्ती असे वर्गीकरण केल्यास दोन्ही भागातील नैसर्गिक आपत्तीचा मानवास या वर्षात मोठ्या प्रमाणात सामना करावा लागला असल्याचे आपणस दिसून येते वर्षाची सुरवातच पृथीच्या भूगर्भातील घडामोडीने आलेल्या नैसर्गिक आपत्तीने झाली तर आता वर्षाची अखेर हवामान बदलामुळे होणाऱ्या संकटामुळे मानवावर आलेल्या आपत्तीने होत आहे चला तर जाणून घेऊया वर्षभरात मानवास सामोरे जावे लागणाऱ्या नैसर्गिक आपत्तीविषयी .प्रथम पृथ्वीच्या अंतरंगातील घडामोडींमुळे आलेल्या संकटाविषयी बोलूया वर्षाच्या पहिल्याच पंधरवड्यात पॅसिफिक महासागरातील रिंग ऑफ फायर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील एक ज्वालामुखीचा मोठ्या प्रमाणत उद्रेक झाला या उद्र्कामुळे या ज्वालामुखीच्या जवळ असणाऱ्या टोंगो या देशात मोठ्या प्रमाणत नुकसान झाले त्यांच्या ज