पोस्ट्स

मे ११, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हे पण घडतयं जगामंदी!

इमेज
    आपल्या भारतात कोरोनाने उच्छाद मांडला असताना अमेरीकेत एका वेगळ्याच कारणाने लोक यमसदनास जात आहे. ते कारण म्हणजे बंदूकीतून होणारा बेछूट गोळीबार. गेल्या आठवड्यात अमेरीकेत विविध ठिकाणी झालेल्या गोळीबारात दोन दिवसात 15 जणांनी पृथ्वीवरून  निरोप घेतला . एका जागतिक अहवालानूसार जगात वर्षभरात जेव्हढ्या बेछूट गोळीबाराचा घटना घडतात, त्यापैकी 50% एकट्या अमेरीकेत घडत असतात .सन.2019 मध्ये 465 आणि सन 2020 मध्ये 628 घटना घडल्याची अमेरीकन पोलीसांकडे नोंद आहे.     अमेरिकन केंद्रीय संविधानाच्या दुसऱ्या घटना दुरुस्तीनूसार तेथील नागरीकांना शस्त्रात्रे बाळगणे हा मुलभूत अधिकार आहे. अमेरीकेच्या काही राज्यात वाँलमाँट सारख्या सुपर स्टोअरमध्ये शस्त्रात्रे मिळतात. यामध्ये बदल होण्याची नितांत आवश्यकता असल्याचे तेथील पोलीसांचे म्हणणे आहे. पुर्वी अमेरीकेत गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली असताना स्वसंरक्षणार्थ अमेरीकन नागरीकांना शस्त्रास्त्रे बाळगण्याचा अधिकार देण्यात आला. आजमितीस ही परीस्थिती पुर्णतः बदलली असून त्यावेळी स्वरक्षणार्थ दिलेली सवलतीने आज अमेरीकेतील सगळ्यात मोठ्या समस्येचे स्वरुप धारण केले आहे. वाढत्य

नव्या राष्ट्राचा प्रसवकळा !

इमेज
सध्या आपल्या भारतात कोरोना रुग्णाच्या वाढत्या संख्येने अत्यंत तणावाची स्थिती असताना, आपल्या भारतापासून साता समुद्रपार असणाऱ्या युनाटेड किंग्डम या देशात एक वेगळीच चर्चा रंगली आहे. (युनाटेड किंग्डम या देशाला आपल्याकडे बोली भाषेत इंग्लड म्हणतात) त्या देशातील एक भाग स्काँटलंड याला स्वतंत्र सार्वोभौम देश म्हणून मान्यता देण्यासाठी सार्वमत घ्यावे का ? या चर्चेने तेथील जनमत पुर्णतः ढवळून निघत आहे. स्काँटलंड या भागासाठी झालेल्या संसदीय निवडणूकीत ( विधानसभेच्या नव्हे संसदेच्या) स्काँटलंडच्या संसदेत   स्काँटलंड नँशनालिस्ट पार्टी (SNP)ने बहुमतापेक्षा 6 जागा कमी मिळवल्या आहेत. मात्र सर्वाधिक जागा मिळवल्या आहेत {युनाटेड किंग्डम मध्ये बहुपक्षीय लोकशाही आहे. मात्र काँझरेटिव्ह पार्टी (मराठीत हुजूर पक्ष) आणि लेबर पार्टी (मराठीत मजूर पक्ष ) हे दोन पक्ष   एकुण संसदेत 97% पेक्षा थोडी जास्त मते मिळवत असल्याने आपला तिथे हे दोनच पक्ष असल्याचा समज होतो. मात्र तिथे लिबरल डेमोक्रेटीक (LD),ग्रीन पार्टी (GNP) असे पक्ष देखील आहेत} स्काँटलंड नँशनलिस्ट पार्टीचे निवडणूकीतील आश्वासनच आम्ही आमच्या पाच वर्षाचा कार्यकाळात