पोस्ट्स

जून २१, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील चीन (भाग12)

इमेज
  सध्या आपल्या  महाराष्ट्रात आरक्षण विषयक चर्चांवर, माध्यमे चर्चांचा खल करत असताना जागतिक स्तरावर कोणता मुद्दा सातत्याने चर्चेत येत आहे? याचा विचार केला असता, एकच मुद्दा सध्या जागतिक स्तरावर विविध स्तरावर आणि विविध भौगोलीक स्तरावर चर्चीला जातोय , तो म्हणजे चीन. सध्या एक दिवसाआड चीनविषयी काहीतरी ऐकायला मिळते.जर एखाद्या दिवशी चीन विषयक ऐकायला मिळाले नाही.. तर भयंकर काहीतर घडल्यासारखे वाटावे, इतक्या मोठ्या प्रमाणात चीन चर्चेला जातोय. चीन हा आपला प्रमुख शत्रू आहे. पाकिस्तान आपल्याविरोधात जी गरळ ओकतोय त्याचा पाया चीनच असतो.त्यामुळे त्या घडामोडी आपणास माहिती असणे आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेवूया गेल्या तीन चार दिवसात चीन संदर्भात घडलेल्या गोष्टी. तर मित्रांनो गेल्या तीन चार दिवसात चीन प्रमुख 3 घडामोडींमुळे चर्चेत आला.एक घडामोड चीन नेपाळ सबंधावर आधारित आहे.एक घडामोड चीन पाकिस्तान सबंधावर आधारित आहे. तर एक घडामोड चीन आँस्टोलीया या सबंधावर आधारित आहे. आता बघूया या घडामोड.      तर सध्या जगात सर्वत्र कोरोना लशीकरण चालू आहे. तसे ते नेपाळमध्ये देखील चालू आहे. भारताकडून काही लसी नेपाळला मिळाल्या.