पोस्ट्स

सप्टेंबर ४, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

विदर्भातील अपरिचित अष्टविनायक

इमेज
सध्या आपल्या महाराष्ट्रात सर्वत्र गणपती बाप्पाची धूम चालू आहे . या गणेशोत्सवात गणपती दर्शनाचे विशेष महत्व आहे . आपल्या महाराष्ट्रात प्रामुख्याने पुणे परिसरातील गणपतीची ठिकाणे प्रसिद्ध आहेत . मात्र आपल्या महाराष्ट्रात फक्त हीच गणपतीची ठिकाणे नाहीत . तर विदर्भात सुद्धा गणपतीची आठ ठिकाणे प्रसिद्ध आहेत . ज्याला वैदर्भीय अष्ट गणेश म्हणतात या खेरीस देवीप्रमाणेच गणपतीची साडेतीन ठिकाणे देखील आहेत . पहिल्यादा आपण विदर्भातील अष्टविनायकांची माहिती घेउया . वरदविनायक- टेकडी गणपती   विदर्भातील अष्टविनायकातील पहिला समजला जाणारा गणपती म्हणजे नागपूरचा टेकडी गणपती. ऐन नागपूरमध्ये असलेले हे प्रसिद्ध देवस्थान पिंपळाच्या झाडाखाली गणेशाची शेंदूरचíचत प्रतिमा पाहायला मिळते. नागपूर हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे गाव. प्राचीन काळापासून अगदी पुरातत्त्वीय संदर्भ आणि पुरावे नागपूरसंदर्भात उपलब्ध आहेत. ऐतिहासिक भोसले-इंग्रज लढाई ज्या सीताबर्डी परिसरात झाली तिथेच हे गणपतीचे मंदिर आज उभे आहे. स्वयंभू गणेशाची ही मूर्ती एका प्राचीन मंदिराच्या भग्न झालेल्या अवशेषांमध्ये मिळाली असे सांगितले जाते.मंदिराची लोकप्रियता ख