पोस्ट्स

डिसेंबर १२, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्पर्धा परीक्षेत होरपळणारी तरुणाई

इमेज
        महाराष्ट्राच्या गृहनिर्माण खात्याच्या   कॅबिनेट स्तरावरील मंत्र्यांनी ११ डिसेंबरच्या रात्री आणि १२ डिसेंबरच्या पहाटे एक व्हिडिओद्वारे म्हाडा या  महानगरांमध्ये घरे तयार करणाऱ्या प्राधिकरणातील परीक्षा रद्द करत असल्याचे आणि त्या जानेवारी २०२२ मध्ये घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले . परीक्षेचे पेपर फुटले असल्याची शक्यता आहे म्हणून या परीक्षा रद्द करत असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले . परीक्षेच्या आदल्या रात्री जाहीर  केलेल्या या निर्णयामुळे या या परीक्षेच्या परीक्षार्थींमध्ये अत्यंत संतापाची लाट उमटली या आधी आरोग्य खात्यातील परीक्षांमध्ये  प्रकार झाल्याच्या संशयावरून त्या परीक्षा रद्द झाल्या होत्या . या सरकारला परीक्षा योग्य पद्धतीने का घेता येत नाहीत ? अशा रास्त सवाल त्यांचा होता सध्या एसटीचा संप सुरु आहे परिणामी ग्रामीण जनतेचे प्रचंड हाल होत आहे . खासगी वाहतूकदार मनाला वाटेल त्या दारात प्रवाश्यांकडून भाडे घेत  त्यामुळे खेड्यातील परीक्षार्थी या संकटाला सामोरे जात  या परीक्षेसाठी शहारत आले होते .  ही परीक्षा रद्द झाल्याने त्यांना या परीक्षेसाठी पुन्हा यावे लागेल . त्यांना  पुन्ह