पोस्ट्स

सप्टेंबर २०, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मनुष्याची वाटचाल वेगाने अंताकडे

इमेज
  गेल्या 3 आठवड्यात आपल्या भारतात एका अभिनेत्याचा मृत्यूबाबत  वृत्तवाहिन्या हिरीहिरीने वार्तांकन करत असताना समस्त पृथ्वीवरील मानवजातीच्या छातीत धस्य व्हावे , अश्या  चार घटना चार वेगवेगळ्या खंडात घडल्या.त्याविषयी माहिती देण्यासाठी आजचे लेखन .                   तर मित्रांनो,  उत्तर अमेरीका खंडातील कँलिफोर्नियाच्या जंगलातील आग तसेच आशिया खंडातील सैबेरीयाच्या पश्चिमेला आर्क्टिक प्रदेशात लागलेली आग मोठे प्रयत्न करून देखील विझत नाहीये. त्याचप्रमाणे  गेल्या वर्षाभरापुर्वी लागली तसीच आग दक्षिण अमेरीकेतील अँमेझाँनचा जंगलात लागली आहे. या आगींमुळे पृथ्वीवरील तापमान वाढवणाऱ्या ग्रीन हाउस गँसचे प्रमाण प्रचंड वाढणार असल्याची भिती या विषयातील जाणकार व्यक्त करत आहे .हे कमी काय म्हणून युरोप खंडातील ग्रीनलँड येथील तसेच हिमालयातील नेपाळ भारत सिमेवर उगम पावणाऱ्या कोसी,  गंडक या नद्यांच्या उगम क्षेत्रातील  आणि  नेपाळ तिबेट सिमेवरील बर्फ वितळण्याचा  वेग झपाट्याने वाढत असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे .कोसी गंडक या बिहार राज्यातील प्रमुख नद्या आहेत . जर झपाट्याने बर्फ वितळून या नद्यांना अचानक मोठे पूर आ