पोस्ट्स

सप्टेंबर १२, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया

इमेज
    सर्वप्रथम सर्वांना गणेशॊच्छवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा . सध्या आपण सर्व मराठी भाषिक गणेशॊच्छवच्या रंगात रंगून गेलो आहोत . मित्रानो बुद्धीची देवता असणारी , कोणत्याही पूजेच्या वेळी अग्रपूजेचा मान असणारी , गणाचा अधिपती असणाऱ्या गणपती ही देवता फक्त आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतातच पुजली जाते , असे आपणास वाटतं असेल तर आपण चुकलात   , भारताबरोबर भारत आणि चीन या प्राचीन संस्कृतीचा एकत्रित प्रभाव आढळणाऱ्या आग्नेय आशियातील अनेक देशात गणपती पुजला जातो . . माझे   आजचे लेखन आग्येय आशियातील गणपतीची माहिती देण्यासाठी  .    व्हिएतनाम मध्ये शिवलिंग , विष्णू , दुर्गा , कार्तिकेय , गणपती त्याचप्रमाणे बुद्ध , बोधिसत्व यांच्या प्रतिमा आढळल्या आहेत . व्हिएतनाममधील ‘ मी सोन ’ ( स्थानिक भाषेतील याचा अर्थ सुंदर पर्वत असा होतो ) या ठिकाणी सातव्या शतकातील शिवालयाचे अवशेष सापडले होते . या शिवालयाच्या आवारातील एका मंदिरात एका उंच पीठावर एक उभी गणेशमूर्ती आढळून आली होती . या मूर्तीची उंची ९६ से . मी . आहे .