पोस्ट्स

सप्टेंबर ३०, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सायबर क्षेत्रातील आपला वावर सरंक्षित होण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक

इमेज
   सध्या आपल्या सर्वांच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक म्हणजे इंटरनेट . माझ्या लहानपणी शाळेत असताना विज्ञान शाप कि वरदान असा विषय निबंधासाठी असे आता त्यांची जागा   इंटरनेट शाप [ कि वरदान   हा विषय घेतो कि काय असे वाटावे इतपर्यंत आपले आयुष्य इंटरनेटशी जोडले गेले आहे .  कोव्हीड १९ च्या साथरोगानंतर सुरु झालेल्या न्यू नॉर्मल या जीवन पध्द्तीची तर इंटरनेटशिवाय कल्पना करणे देखील अवघड    आपण फक्त सोशल मीडियासाठीच इंटरनेट वापरतो असे नाही तर रोजच्या दैनंदिन आयुष्यात एकमेकांना पैसे देण्यासाठी सुद्धा आपण फोन पे गूगल पे सारख्या माध्यमांचा वापर करतो . जी मुख्यतः इंटरनेटवरच कार्यरत राहतात . आजकाल फक्त प्रौढ जनताच नव्हे तर लहान मुले मुली सुद्धा इंटरनेट लीलया हाताळतात . या लहान मुला मुलींना इंटरनेटमधील चांगल्याच बाबी प्रामुख्याने लक्षात असतात मात्र या इंटरनेटच्या वापरातील धोके अनेकदा त्यांना माहिती नसतात या इंटरनेटच्या जगतात फसवणूक झाल्यास मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते तसेच अ