पोस्ट्स

फेब्रुवारी २७, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भारतीय रेल्वेची गगग भरारी

इमेज
    भारतातील दुर्गम, अविक प्रदेश रेल्वेच्या नकाश्यावर आणण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरु आहेत.ज्यामध्ये इशान्य भारत आणि जम्मू काश्मीरचा अधिकाधीक भाग रेल्वेने देशातील इतर भागाशी जोडणाऱ्या विकाम कामांचा उल्लेख करावाच लागेल. इशान्य भारतातील राज्यांची किमान राजधानी तरी रेल्वेच्या नकाश्यावर यावी, यासाठी रेल्वेकडून प्रयत्न सुरु आहेत. तसेच जम्मू काश्मीरमध्ये जास्तीत जास्त आतपर्यंत रेल्वेचे जाळे विस्तारण्याचे रेल्वेचे प्रयत्न आहेत.   जम्मू काश्मीरमध्ये उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल लिंक  या नावाने रेल्वेचे जाळे विस्तारण्याचा प्रकल्प सुरु आहे. हा प्रकल्प यु .एस बि. आर.एल. या नावाने प्रसिद्ध आहे.रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणून हा प्रकल्प परीचित आहे.हा  रेल्वेप्रकल्प 2003च्या आधीपासूनच सुरु आहे. नुकतीच या रेल्वे मार्गातील मोठा माईल स्टोन गाठण्यात आला. या प्रकल्पातीलच नव्हे तर भारतातील सर्वात मोठा रेल्वे बोगदा तयार करण्यास रेल्वे अभियंत्रांना यश मिळाले. तब्बल 12 हजार 700 मीटर लांबीचा हा बोगदा संबल ते अरीहनचरा या दरम्यान आहे. या बोगद्याची एक बाजू समुद्रसपाटीपासून 1400