पोस्ट्स

जून ९, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

रशिया युक्रेन युद्धाच्या अप्रकाशीत बाजू

इमेज
              रशियाने युक्रेनवर केलेल्या गोष्टीला आता १०० दिवस झाले आहेत अजूनही युद्ध संपले नाहीये युद्ध कधी संपेल हे आताच सांगणे अवघड आहे युद्धाच्या शेवट कसा होणार कधी होणार याबाबत अनिश्चितता असली तरी त्यांचे परिणाम आता दिसत आहे जगात अन्नधान्याचे भाव प्रचंड वाढले आहेत गव्हाची प्रचंड टंचाई झाली आहे नैसर्गिक इंधनाचे नियंत्रण बऱ्याच मोठ्या प्रमाणत आखाती मध्यपूर्व देशांकडे गेले आहे (पूर्वी जागचे नियंत्रण मोठ्या प्रमाणत युरोप खंडातील देशांकडून होत असल्याने आणि त्यांच्यासाठी सदर प्रदेश पूर्वदिशेच्या मध्यभागी असल्याने त्यास ते मध्यपूर्व म्हणत त्यानंतर  त्याला तेच नाव पडले त्यामुळे आपल्या पश्चिमेला असून देखील आपण तेच म्हणतो असो ) ज्याची परिणीती नैसर्गिक इंधनाचे दर वाढण्यात होत आहे (एखाद्या गोष्टीबाबत एकाधिकारशाही झाल्यास दुसरे काय होणार ) मी वर सांगितलेल्या बाबींवर या आधी माध्यमातून सांगण्यात आले आहेत हे बदल आपण अनुभवत सुद्धा आहोत मात्र युद्धाचे फक्त इतकेच परिणाम नाहीये किंबहुना हे परिणाम म्हणजे फुटकळ चणे फुटाणे वाटावे असे संकट येणार आहे ज्याचा परिणाम पुढील दोन ते तीन पिढ्यापर्यंत राहू शकतो

मानसिक अनारोग्याची राजधानी नाशिक ?

इमेज
      मानसिक अनारोग्याची राजधानी नाशिक तर नाहीना  ? अशी शंका यावी,  अश्या घटना गेल्या सहा महिन्यापासून नाशिक शहरात  घडताना दिसत आहे . शहरात वाढलेल्या आत्महत्येच्या घटना कमी की काय म्हणून आता अत्यंत शुल्लक कारणामुळे लोक हिंसक होत आहे शुल्लक कारण अत्यंत महत्त्वाचे वाटल्याने लोक हिंसक होत आहे शुल्लक कारण अत्यंत महत्त्वाचे दुसऱ्याचा जीव घेण्यासारखे वाटणे हे संबंधित व्यक्तीचे मानसिक स्वास्थ उत्तम नसल्यचे प्रतीक म्हणता येईल   आणि या घटना वाढल्यामुळे   मानसिक अनारोग्याची राजधानी नाशिक तर नाहीना  ? अशा प्रश्न उपस्थित आहे           समर्थ रामदास स्वामी यांच्या जगी सर्व सुखी अशा कोण आहे ? विचारी मना तोच शोधूनि पाहे या संत वचनानुसार जगातील प्रत्येकाला काहींना काही समस्या असणार किंवा स्वामी विवेकांनद यांच्या विचाराचा आधार घेतल्यास रोजच्या जीवनात काहीतरी समस्या असणे हे जीवन योग्य मार्गवर चालत असल्याचे लक्षण आहे सबब समस्या हा जीवनाचा आधार आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही तसेच जीवनातील कोणतीही समस्या कायमस्वरूपी नसते काही काळानंतर समस्या सुटतेच याचा अनुभव देखील आपण अनेकदा घेत असतो काही लोक मात्र त