पोस्ट्स

ऑक्टोबर ३०, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जळता पाकिस्तान

इमेज
         आखाती देशात सुरु  असणाऱ्या क्रिकेटच्या टी २० विश्व चषकात पाकिस्तान एकामागून एक सामने जिंकत असले तरी,  पाकिस्तानमधील अंतर्गत स्थिती अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचली आहे . पाकिस्तानी सरकारने बंदी घातलेल्या मात्र झालेल्या स्थानिक निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या "तैहरिके ए लब्बेक पाकिस्तान" या पक्षातर्फे पाकिस्तानच्या पंजाबची  राजधानी असलेल्या लाहोरपासून पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादपर्यंत  लॉन्ग मार्च काढण्यात येत आहे . हा मजकूर लिहीत असताना (३० ऑक्टोबर ) हे  आंदोलक वझीराबाद या शहरात आलेले आहेत . शुक्रवार २९ ऑक्टोबर रोजी हे  आंदोलक गुजरानवाला या शहरातून वझीराबाद या शहरात पोहोचले  यापुढील वाटचाल पक्षाच्या शीर्ष नेत्यांच्या सांगण्यावरून होईल , अशी आंदोलनकांची भूमिका आहे "          तैहरिके ए लब्बेक पाकिस्तान" या संघटनेने केलेल्या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ते सौदी अरेबियाच्या दौऱयावरून परत येताच तातडीची पाकिस्तनच्या नॅशनल सिक्युरिटी कॉउंसिल ची बैठक बोलवली आहे  शहरातील इंटरनेटची सेवा बंद करण्यात आलेल