पोस्ट्स

एप्रिल १३, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बातमीतील चीन (भाग 6)

इमेज
सध्या आपला महाराष्ट्र कोरोनाचा संकटाशी निकराचा लढा देत असताना आपल्या भारताच्या शेजारील चीन देशाबाबत सुद्धा नाट्यमय घडामोडी घडत आहे.  ज्यामध्ये तूर्कस्थानच्या राजधानीत  अर्थात अंकारा शहरात असणाऱ्या चीनच्या दुतावासाच्या पाण्याचा पुरवठा अंकाराच्या महापौरांनी तोडणे, तसेच चीनने भूटान बरोबरच्या सीमाविवादात आंतीम तोडगा काढण्यासाठी बोलणी सुरु करण्याची तयारी करणे या घडामोडी महत्तवाचा आहेत.     तर मित्रांनो, चीनच्या अतिपश्चिमेकडे लडाखच्या उत्तरेला गिलगीट बाल्टीस्तानला लागून चीनचा सिंकीयांग (काही ठिकाणी याला झिंकीयांग असेही म्हणतात)हा प्रांत आहे. पुर्व तूर्कस्थान या नावाने सुद्धा प्रसिद्ध असलेल्या या प्रांतात मुस्लीम समाजबांधवांची संख्या प्रचंड आहे. वंशाचा, आणि भाषेचा  विचार करता येथील स्थानिक चीनपेक्षा तूर्कस्थानला अधिक जवळचे आहेत. गेल्या काही दिवसांपासून चीन येथील मुस्लिम बांधवांवर अत्याचार करत असल्याचा बातम्या सातत्याने येत आहे. ज्यामुळे तूर्कस्थानात या मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात असणाऱ्या देशामध्ये जनमत चीन विरोधी आहे. सध्याचे सरकार चीनविरोधी उघड भूमिका घेत नसले तरी विरूद्ध पक्ष जनमताचा बाज

वंदन अभ्यासू व्यक्तिमत्वाला

इमेज
   ती व्यक्ती अर्थशास्त्रातील तज्ज्ञ होती, ती व्यक्ती राजशास्त्र, कायद्यांच्या बाबतीत तज्ज्ञ होती, ती व्यक्ती इतिहास आणि कृषिशास्त्र , समाजशास्त्र या एकमेकांशी सबंध नसणाऱ्या विषयातील तज्ज्ञ होती. त्या व्यक्तीचे नाव आहे. डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर .2021 एप्रिल 14 रोजी त्यांची 130वी जयंती , त्यानिऐमित्ताने सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.        वर्षोनवर्षे शिक्षण आणि पाणी यासारख्या मुलभूत गोष्टी नाकरलेल्या समाजातील या महामानवाने स्वकष्टातून समस्त भारतीयांच्या कल्याणाचा वसा घेतला. डाँक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे घटनानिर्मितीतील योगदान अतूलनीय आहे. मसुदा समितीतील अन्य सदस्य, देश सोडल्यामूळे , आजारी असल्यामुळे किंवा निधन पावल्यामुळे कार्यरत नसल्याने घटना निर्मितीची सर्व जबाबदारी त्यांनी एकट्याने लिलया पेलली. आणि जगातील एक सर्वोत्तम संविधान त्यांनी तयार करण्यात मोलाची भूमिका बजावली.       डाँक्टर बाबासाहेबांचे संविधान निर्मितीतील योगदान सर्वश्रूत आहेच. मात्र त्यांचे भारतीयांसाठी एव्हढेच योगदान नव्हे,  ते कामगार मंत्री असतांना त्यांचा प्रयत्नामुळे अनेक कामगार हिताचे कायदे समंत झाले. कामगरांचे किम