पोस्ट्स

नोव्हेंबर ८, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

नोटबंदी नंतरची ३ वर्षे

इमेज
                                                                                    आज ८ नोव्हेंबर २०१९ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक अश्या विमुद्रिकरणाला (नोटबंदी )३ वर्षे पूर्ण झाली . या ३ वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे . काळ्या पैशाच्या निर्मूलनासाठी उचलेले हे एक धाडसी पाऊल होते . हे पाऊल कितपत  यशस्वी झाले ? यावर मतमतांतरे असून शकतात . मात्र हा एक धाडसी निर्णय होता , याबाबत मात्र दुमत नसावे . भारताच्या आर्थिक इतिहासात डोकावले असता आपणास असे लक्षात येते की , इंदिरा गांधींनी घेतलेल्या बँकेच्या राष्ट्रीयकरणाचा निर्णय असो , अथवा  नरसिहराव पंतप्रधान असताना घेललेला  भारतीय अर्थव्यवस्था परकीय लोकांसाठी खुली करण्याचा निर्णय असो . अश्या काही महत्तवाच्या निर्णयांमध्ये याचा समावेश करता येईल .                                  यामध्ये कोणत्या बँकेतून  किती रक्क्म जमा झाली ?, त्यासाठी किती दिवस लागले ? यावरून काही लोक विविध तर्क काढू शकतात .त्यांना तो तर्क काढू दयावा  माझा लेखनाचा तो विषय नाहीये . काही लोकं सध्याचे मंदीचे खापर त्यावर फोडत आहे . खरेखोटे तेच जाणे