पोस्ट्स

डिसेंबर १, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बुद्धीबळाचे मानसशास्त्र (भाग5)

इमेज
      मागील भागात पालकांची भूमिका आपण बघितली . आता प्रथमावस्थेतील प्रशिक्षकाची भूमिका बघूया . पहिल्या प्रशिक्षकाची भूमिका अत्यंत महत्वपूर्ण असते . खेळाडूच्या खेळाला आकार देण्याचे काम या प्रशिक्षकाला करावे लागते . ज्यामध्ये खेळाडूंची सकारात्मकता , खेळाचे कौशल्य वाढविणे , खेळाची शिस्त निर्माण करणे , खेळाविषयीची भीती घालवणे . हॉल मधील भीती तसेच त्याच्या वर्तनावर लक्ष देण्याचे कार्य या  गोष्टींचा  अंतर्भाव होतो .  सतत तक्रार करणे , सामना हरल्यावर कारणे सांगणे , हॉलमध्ये इकडे तिकडे अथवा इतरांचे डाव बघणे , काही कारणामुळे मानसिक तोल जाणे तसेच हरल्यानंतर चिडचिड करणे , खेळताना निराश होणे , अश्या  खेळाडूंच्या अनेक सवयीचा  स्वभावाचा  तसेच या सारख्या मनोशारीरिक घटकांचा अभ्यास करत खेळाडूला घडवण्याचे  प्रशिक्षकाला करावे लागते  बुद्धिबळ येणं आणि बुद्धिबळ समजणं या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत . बुद्धिबळ प्रशिक्षकाला आपल्या खेळाडूला बुद्धिबळ समजावतात आले पाहिजे . तर आणि तरच चांगला खेळाडू घडवता येतो . वेळोवेळी चांगली खेळी केल्यावर किंवा  कोडे सोडवल्यावर त्याला प्रॉत्साहित केले पाहिजे . खेळाडूच्या पालका

नवे संकट सामोरी !

इमेज
          महाराष्ट्राचा अनेक भागात बेमोसमी पावसाने आकांडतांडव सुरू केले आहे.  आपणच तयार केलेले  भाषा , धर्म , जाती, राज्य, देश , श्रीमंत, गरीब हे भेद विसरुन हवामान बदलाविषयी ठोस काहीतरी करण्याची गरज यामुळे पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे. गेल्या दिड वर्षाच्या आढावा घेतल्यास जगभरात आपणास लहरी हवामानाचा फटका बसल्याचे वारंवार दिसून आले आहे. तसेच दुसऱ्याचा अनुभवातून शहाणे न होता स्वतःला फटका बसल्याशिवाय शहाणपण न येण्याची वृत्ती देखील दिसून येत आहे. जे वाईट आहे. जगात काय चाललंय ?याचा कानोसा न घेता स्वतःच्याच विश्वात रममाण होण्याची किंमत भारताने इतिहासात अनेकदा भोगली आहे. मात्र त्या इतिहासातुन बोध घेत भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता स्वतःमध्ये निर्माण करण्यात आपण कमी पडतोय. गेल्या दिड वर्षात जगभरात विविध प्रदेशात लहरी हवामानाच्या अनेक घटना घडल्या,मात्र त्यातून बोध घेत आपल्याकडे असे काही झाले तर ? काय करायचे याबाबत आपण काहीच कार्यवाही केली नाही. परीणामी आज शेतकऱ्यांना जगण्यापेक्षा मरणं स्वस्त झालंय।      गेल्या काही वर्षापासून आपणास बेमोसमी पावसाचा वारंवार फटका बसतोय.मात्र शेतकऱ्या