पोस्ट्स

नोव्हेंबर ५, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

बलीप्रतीपदा

इमेज
        आज बली प्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा , या दिवशी   पत्नीने पतीला स्नान घालण्याची प्रथा आहे . आजच्या दिवशापासून गुजराती बांधवांचे आणि व्यापारी वर्गाचे नविन वर्ष सुरु होते . हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचे समजले जाणाऱ्या साडेतीन मुहुर्तापैकी एक पुर्ण मुहुर्त असणाऱ्या आजच्या दिवशी नविन वस्तू , सोने आदी खरेदी करण्याची प् कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो . हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतातया दिवशी बळी राजाचे रांगोळीने चित्र काढतात व त्याची पूजा करतात आणि ' इडा पीडा टळो व बळीचे राज्य येवो ' असे म्हणतात साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे . शेतकरी पहाटे स्नान करून डोक्यावर घोंगडी घेतात व एका मडक्यात कणकेचा पेटता दिवा घेऊन शेतात जातात व ते मडके  शेताच्या बांधावर खड्डा करून पुरतात . काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा करून तिची पूजा केली जाते . शेणाचा बळीराजा करण्याची प्रथाही अस्तित्वात आहे . या शेणाला