पोस्ट्स

नोव्हेंबर २०, २०१८ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माते नर्मदे

इमेज
नूकतेच मी ' दत्तप्रसाद दाभोळकर' लिखीत " माते नर्मदे "हे पुस्तक वाचले .पुस्तक सुप्रसिध्द "सरदार सरोवर " या विषयावर आधारीत असून पुस्तक सरदार सरोवराच्या बाजूने मतप्रदर्शन करते . जे मेधा पाटकर अमिर खान यांच्यख आंदोलनामुळेतयार झालेल्या  आपल्या पारंपारिक संकल्पनेला पुर्णपणे छेद देणारे आहे .  पुस्तकात अनेक आर्थिक संकल्पना , पर्यावरणीय संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या असल्या तरी पुस्तकाची भाषा सहज सोपी वापरल्याने पुस्तक कंटाळवाणे न बनता रंजक झाले आहे . जे वाचताना सहजतेने ठाव घेते . पुस्तकाचा पाया ,हे धरण होणे पाश्च्यातांच्या आर्थिक साम्राजवादाचा पाया हलवणारे असल्याने ते पर्यावरणाचा बागुलबुवा उभा करत असून या संस्थांना परदेशी संस्थेकडून वित्तसाह्य होते हा आहे .जगात या पेक्षा मोठी धरणे झाली असून पाश्चात्य राष्ट्रात अनेक प्रकारे पर्यावरणाची हानी होते . माञ ती राष्ट्रे भारताला त्याच घटकाचा आधार घेत प्रगती करण्यापासून रोखतात .हा आहे . पुर्वी उभारलेले मोठे प्रकल्प हे खोरे निहाय अभ्यास करुन उभारलेले नसल्याने फारसे उपयोगी पडलेले नाहीत . नर्मदा नदीत सरदार सरोवरा अंतर्गत