पोस्ट्स

फेब्रुवारी २५, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वंदन समाजसुधारक स्वातंत्र्यवीरांना

इमेज
                महान व्यक्तींमध्ये आपणास व्यक्तीमत्वाचे अनेक पैलू आढळतात.त्यातील सर्वच जगासमोर येतात असे नाही,महान व्यक्तींचे अनेक पैलु दुर्देवाने अचर्चीतच राहतात. स्वातंत्र्यवीर सावरकर हे सुद्धा या नियमाला अपवाद नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे  अंदमानातील जीवन ,तेथून सुटका आणि 1947नंतरच्या त्यांचा जीवनाविषयी अनेकदा बोलले जाते.मात्र या सर्व प्रकारात त्यांचा एक पैलू दुर्दैवाने अप्रकाशीतच राहतो, तो म्हणजे आपल्या रत्नागिरीच्या मुक्कामात त्यांनी केलेले समाजप्रबोधनाचे कार्य. आपल्या भारतीय स्वतंत्रलढ्याकडे नजर टाकल्यास लोकमान्य टिळकांसारखे स्वातंत्र्यासाठी पेटलेले नेते दिसतात मात्र समज सुधांरणेबाबत लोकमान्य टिळकांची मते काहीशी प्रतिकूल होती सर्वप्रथम हे परकीय राज्य इथून निघून गेले पाहिजे  परकीय राज्य जाऊन स्वकीयांचे राज्य आल्यावर सामाजिक सुधारणा सहजतेने करता येईल आपले ध्येय परकीय सत्ता उलथून टाकणे हेच असले पाहिजे हे असे लोकमान्य टिळकांना वाटत असे . तर ज्येष्ठ समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर याच्या मते भारतीय समजणे ब्रिटिशांच्या राजवटीचा फायदा घेत सामाजिक सुधारणा केल्या पाहिजेत सामाजिक सुधारणा झ